जिजाऊ डायरी
दिनांक 14.1.2026 वेळ पहाटे 3:15am
स्थळ cloud nine hospital vashi room no 05.
birth date 12.1.2026 वेळ 5.45PM
जिजाऊसाठी पहिला लेख
एक असते आई.. जी आपल्यासाठी सर्वकाही समर्पित करते.. मग आपल्या आयुष्यात येते पत्नी.. जी आपल्यासाठी सर्व काही त्यागून आलेली असते... आई आपले लाड करते.. पत्नी आपल्याला जबाबदार बनवते.. पण त्यानंतर आपल्या आयुष्यात येते आपली मुलगी.. जी शिकवते आपल आयुष्य किती महत्वाचं आहे.. कारण आता आपलं सर्वकाही तिच्यासाठी असते.. तिच्यासाठी त्याग असतो, समर्पण असते.. लाड असतात.. बाप बनणे एक सुंदर फिलिंग आहे. पण मुलीचा बाप बनणे म्हणजे सर्वोत्तम फिलिंग आहे.. आज दुसरी रात्र जागत आहे.. गेले 2 दिवस भूक, झोप सर्वकाही विसरलो आहे.. आराध्यसाठी त्याचा वेळ द्यायचा ही जबाबदारी आहे.. आणि जिजाऊ साठी रात्र जागून काढायची हा आनंद आहे..
जयंत जगताप
Comments
Post a Comment