सार्वजनिक कार्य

     *माझा अनुभव सार्वजनिक कामाचा*
सार्वजनिक कार्य चालू करताना विरोधक हे असतातच. त्यांना कामाचे स्वरूप सांगून कामाची सुरुवात करणे गरजेचं असते पण अस सांगून ही विरोध राहत असेल तर जास्त चुचकरात बसणे योग्य नसते.

सार्वजनिक कार्य हे सार्वजनिक सभा(मिटिंग) घेऊन पुढे नेले जाते, ज्यांना सहभाग घ्यायचा असतो ते अशा मिटिंग ला हजर राहून सहभाग घेतात.

एकदा कार्य चालू झाले की वयक्तिक हेवेदावे सोडून हाती घेतलेले कार्य कसे पूर्ण होईल त्यावर लक्ष देणे गरजेचे असते. जुन्या चुका परत परत काढत बसणे म्हणजे चालू कार्याचा वेग मंदावणे असते. त्यामुळे भविष्यात नवीन कार्य हाती घेताना कार्यकर्ते कचवतात.

सहसा जे कार्यात शामिल नसतात तेच विरोधात उभे असतात.

कार्य होताना सहभाग न घेता, नंतर आपले ज्ञान झाडून चुका काढणारे म्हणजे साप मेल्यावर धोपाटे टाकण्यासातखे असते. 
सार्वजनिक कार्यात प्रश्न विचारावे पण त्याआधी त्यात सहभाग घ्यावा, करण त्यातच अर्धे प्रश्न सुटून जातात.

कार्य पूर्ण होताना शेवटची वीट महत्वाची असते, पण पहिली वीट लावणारा कधीही श्रेष्ठ असतो. कारण सुरवात करणे कधीही धाडसाचे असते.

महाभारत मध्ये श्रीकृष्ण , शिशुपालला 100 अपराध माफ करत असतो, त्या माफीला शिशुपाल कृष्णाची कमजोरी समजतो. पण शेवटी श्रीकृष्ण धर्म पालन करत 100 अपराध झाले की आपले विराट सुदर्शन चक्र चालवून शक्तीचा प्रत्यय देतो. 
 तसेच आपल्या आजूबाजूला आपलेच स्वकीय आपल्याला कमजोर समजून बेफान वागतात. स्वतःला सर्वशक्तिमान समजून अहंकारी वागतात, मित्र परिवार, नाते गोतें तुच्छ समजतात,  तेव्हा त्यांना प्रत्यय येण्यासाठी अवघड निर्णय घ्यावे लागतात.

कोणी एकटा मोठा नसतो, समूहाची एकी मोठी असते, कधी कधी आपला समहू चुकला तरी सोबत राहून चूक सुधारणे आपले कर्तव्य असते, बाहेरून चुका दाखवणे आणि इतरांशी तुलना करणे म्हणजे समहूचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासारखे असते.

Jayant jagtap


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)