कर्मवादी
कर्मवादी
कर्मवादी जे असतात त्यांनी आपले कर्म करत राहायचे असते. ते करताना कधी कधी चुकभुल होत असते म्हणून थांबायचं नसत. त्यातून शिकून परत पुढे चालायचं असत. आपल्या कर्माचा हिशोब आपण नाही ठेवला तरी आजकाल समाजात असे काही प्रवृत्ती आहेत जे तुमच्या कर्माचा हिशोब ठेवत असतात. त्यांचं एखादं कर्म असत आणि तेच तेच परत परत सांगत बसतात. पण दुसऱ्याच खूप कार्य असल तरी त्यातील फक्त चूका काढायची काम हे लोक करत असतात. स्वतः काही सार्वजनिक कार्यात सहभागी नाही होणार पण हा नको, तो नको, काही करण्याच्या आधी आम्हाला विचारा अशी यांची वृत्ती असते. काही सकारात्मक घडले की त्यात काहीतरी उपदेश असे द्यायचे की जस काही बरोबर आणि चूक फक्त यांना कळत.
जणू काहीं दुसऱ्याच पाप-पुण्याचा हिशोब ठेवायच काम यांनाच येत. दुसऱ्याला नाव ठेवून मग ते सार्वजनिक किंवा वयक्तिक कामावरून असो, की वंश परपरेवरून असो. अशा लोकांचा इतिहास हा पळपुटेपणाचा असतो. दुसऱ्यांना नाव ठेऊन स्वतः मोठं होण्याची स्वप्न बघणारी ही प्रवृत्ती असते.
असो प्रत्येक जण कुठे ना कुठे चुकतो पण जो सुधारून पुढे जातो तो सुधारतो. जो फक्त इतिहास काढून घोळत बसतो तो स्वतः प्रवाहातून बाहेर पडतो.
आपण आपलं ध्येय ठरवून चालत राहायचं, जेवढं आपल्याला मागे ओढल जाईल तितकं आपण बलवान होत असतो..
म्हणून कर्म करत रहा.. कर्मवादी बनत रहा.
जयंत जगताप
Comments
Post a Comment