भारत बांगलादेश बॉर्डर- कोलकाता ते जयंतीपुर (petrapol)*

     *भारत बांगलादेश बॉर्डर-  कोलकाता ते जयंतीपुर (petrapol)*
  गोष्ट आहे 1850 च्या काळातील. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने कोलकाता मध्ये पाय रोवले होते. ब्रिटिश सेना आणि काही अधिकारी आपल्या बायका पोरांसह कोलकात्यात येत होते. अधिकाऱ्यांचे कोलकाता ते ढाका येणे-जाणे वाढले होते. कोलकाता ते ढाका असा रस्ता तयार झाला होता. पावसाळा संपला की बैलगाड्या, घोडगाड्या आणि गुलाम चालत असा चालू होतं असे. प्रवास लवकर संपवावा म्हणून दिवसभर न थांबता प्रवास करायचा निर्णय झाला होता. पण भारतात दुपारचे ऊन खूप जास्त असते त्यामुळे उष्माघाताने अनेक जनावरे, घोडी, बैल आणि आणलेले गुलाम दगावत होते. व्यापार वाढवायचा दबाव वाढत होता. 
      मग यावर उपाय म्हणून एक वनस्पती विशेष अधिकाऱ्याने उपाय सुचवला. रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडे लावली की ती उंच वाढतील आणि सभोवताली पसरत जातील. पण याना विशेष अस काही फळ येणार नाही याची काळजी घेतली गेली. स्थानिक भारतीय कामगार आणि हे ब्रिटिश सैनिक यांनी या रस्त्यावर दुतर्फा इतकी झाडी लावलीत की उन्हाळ्यात सुद्धा पूर्ण रस्ता सावली झाली राहू लागला. कालांतराने स्वातंत्र्य नंतर आधुनिकीकरण मध्ये कोलकाता च्या बाजूला अनके झाडे तुटलीत. पण हाब्रा (हावडा नाही) ते बाणगाव  ते जयंतीपुर( आताची भारत बांगलादेश बॉर्डर जिला पेट्रापोल सुद्धा म्हणतात, या 25 ते 30 किमी रस्त्यावर अजूनही अनेक झाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत. मागील आठवड्यात मला या बॉर्डरवर जाण्याचा योग आला आणि हा इतिहास माहिती झाला. 
त्या झाडांचा छोटासा विडिओ इथे देत आहे. नक्की बघा आणि आनंद घ्या. 
https://youtu.be/jPj6DLuQoeg

धन्यवाद
 जयंत जगताप


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)