जगतापांची विहीर आणि मळा
जगतापांची विहीर आणि मळा
जावळी तालुक्यातील महू गावात फक्त 5 घरे असणारे जगताप हे गोळे आडनाव नंतर दुसरे जास्त संख्या असलेलं नाव आहे. गावात पाहुणे म्हणून ओळखले जाणारे जगताप घराचे वंशज साधारण 200 वर्षपूर्वी या गावात वतनावर इथे आले असावेत असे म्हटले जाते. 12 ते 14 पिढ्या इथे राहत असलेलं जगतापांचे जमीन ही वाहागाव, महू आणि पिंपळी शिवारात आहे.
1987 साली जगतापनी शेती साठी गावातील मोठी विहीर खोदली आणि बागायत चालू केली. त्यामुळे त्यांची शेती मळा म्हणून ओळखली जाऊ लागली. शेतात मळा या शब्दाला एक वेगळंच वलय आणि मान असतो तसा ह्या जमिनीला प्राप्त झाला आहे.
पूर्वजांनी कसून आणि सर्व जमीन ओढून पाण्याच्या प्रवाहाला योग्य अशी करून कसदार अशी जमीन तयार केली आहे.
सण 2000 ला विहिरीचे बांधकाम सिमेंट आणि दगडी घेऱ्यात करून घेतले आणि 30 फूट पेक्षा मोठा घेरा असलेली विहीर गावातील सर्वाना पोहण्यासाठी आणि पोहणे शिकण्यासाठी सुरक्षित आणि आवडती झाली.
2000 साली बांधकाम करताना मी स्वतः 10 वि ची परीक्षा देऊन उन्हळ्यात या कामावर होतो मी आणि मोठा चुलत भाऊ निलेश दोघे एकत्र दगडी वाहने, मातीची ने आन करणे, नंतर गाळ काढायच्या कामात हिरिरीने सहभागी होतो.
विहिर तयार झाली आणि बागायत अजून जास्त वाढू लागली. आज भागात जे कांद्याच्या बियाणे चे पीक जास्त घेतले जाते त्याची सुरवात भागात प्रथम जगताप नी केली होती, आजही कांद्याच्या बियांचे व्यापारी प्रथम जगताप आणि त्यातही विनायक जगताप भाऊ यांचे बी सर्वप्रथम देतात आणि बी वाटपास सुरवात करतात.
जगतापनी जपलेला हा मळा आणि विहीर आजच्या पिढीची आपलीशी आहे. काहीही काम नसेल तरीही घरातील एक ना एक व्यक्ती मळ्यात फिरून येतेच. लहान मुले सुद्धा याला अपवाद नाहीयेत.
2020 ला कोरोना मध्ये सर्व जगताप या मळ्यात काही न काही काम करत होते, आम्ही तर जायकाच्या वावरची ताल धरली आणि त्यासाठी लागणारे दगड सर्वांनी अगदी आमच्या बायकांनी ही डोक्यावर वाहून नेले, शेतात घाम गळण्याचा एक वेगळाच आनंद उपभोगता आला.
मळा आणि विहीर हा आठवनतील एक अविभाज्य भाग झाले आहेत.
Comments
Post a Comment