शॉर्टकट
शॉर्टकट चे मोठे अर्थ
काही दिवसांपूर्वी ऑफिस काम करत असताना, एक सहकार्याचा फोन आला. कामाचे बोलणे झाले आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. एक सिनियर सहकारी खूप घाबरून काम करतो, ना स्वतःची बाजू मांडतो ना आमची बाजू मांडतो. त्यावर सहकारी म्हटला त्याच्याकडे G मध्ये D नाहीये. हे शॉर्टकट मला कळत नाहीत लवकर. मी छोटा g काढला त्याला उलटा केला 6 झाला, पण छोटा d आणि मोठा D काही त्यात बसला नाही. सुरवातीला जेव्हा मोबाइल आला तेव्हा, SDGN असे मेसेज यायचे, मला वाटायचं हे चुकून आलं असणार, सहा महिने मी त्याकडे लक्ष दिले नाही, मग अजून एकाच्या मोबाइल मध्ये तेच SDGN दिसले आणि त्याला अर्थ विचारला तेव्हा समजले. असेच H R U , w r u, C T H, I F, TC असे अनेक शॉर्टकट काळलायल वेळ लागला.
चला मग तुमच्याकडे कोणते कोणते शॉर्टकट आहेत ते सांगा बरं
Comments
Post a Comment