फोऊजीच लग्न
*फोऊजीच लग्न*
खरतर आम्ही नशीबवान आहे की आम्हाला 3 मावश्या लाभल्या. तसं अनेकांना अनेक मावश्या असतात पण सर्वामध्ये घट्ट बॉंडिंग नसत जस यांच्या मध्ये आहे. आई वडील लवकर देवाघरी गेल्यामुळे या चौघी एकमेकींच्या आधार बनल्या. तसा मोठा भाऊ आहे. तो त्याच्या संसारात रमला आणि या चौघीनी एकमेकींना इतकं जवळ आणलं की जस ही चार घर नसून एकच घर वाटू लागलं. त्यात दोघी-दोघी एका गावात आणि घरही जवळच. पहिली आणि तिसरी महू मध्ये तर दुसरी आणि चौथी पानस मध्ये. त्यात पहिली आणि चौथी शेतीत आणि दुसरी आणि तिसरी मुंबई -गाव करत असे. त्यामुळे कुठेही असल्या तरी एकमेकींना सोबत असत. लहानपणी उन्हाळ्यात आमचं वास्तव्य इंदू मावशी कडे असायचं. माझा चेहरा सुमा मावशी सारखा दिसतो आणि वंदा मावशी माझी लाड करणारी मावशी. असच सर्व मुलांचं सर्व मावश्या बरोबर वेगवेगळ नात आहे. कधी कधी आई पेक्षा या मावश्या जवळच्या वाटतात.
चौघींचे मूल मुलीही त्यांची वडील नाती सांभाळून इकडे रमललेली. आम्ही ही सक्के भाऊ बहीण सारखे एकमेकांना सांभाळून राहतो. त्यात आमचे सर्व दाजी पण एकदम मोकळ्या मनाने सामील होतात. त्यांचा आदर ठेवत आम्ही त्यांना ही मस्तीत सामील करतो. त्यात आमचा एक हुकुमाचा एक्का (अण्णा) आता नाहीये, ती खंत नेहमी जाणवते.
तर आमच्या या गोळे, जगताप, गोळे, नवसरे घरातील सर्वात छोटा आणि भारतीय सैन्यात भरती झालेल्या आकाशच लग्न 13 मे ला झालं. भाऊ-बहिणी पिढीच हे शेवटचं लग्न होत, त्यामुळे हे लग्न झोकून देऊन जल्लोषात करायचं हे सर्वांनी ठरवलं होतं. प्रत्येक गोष्ट बारकाईने केली जात होती. जावा जावा मिळून प्लॅन तयार करत होत्या. खरेदी, मीटिंगस होत होत्या. Dress कोड तयार होत होते. सर्व जण आपल काम चोख पार पाडत होते. त्यात या चौघी एक एक कामात पारंगत आहेत. त्या आपली भूमिका पार पाडत होत्या.
उटणेला जो जल्लोष चालू झाला तो लग्न, मग पूजा करूनच थांबला. सर्वांना राहण्याची योग्य व्यवस्था सुमा मावशी, लग्न घरी होती. काहीजण पानस महू करत होते. मी आणि आरु ने तर एक रूम आमच्या नावावर करून घेतली होती.
उटणं ला सर्वजण इतके नाचले की असा फॅमिली डान्स या अगोदर झाला नव्हता. मग मेहंदी कार्यक्रम मनीषा ने गाजवला. लग्न दिवशी गावातून मिरवणूक, फोटो काढणे, मग हळदी जेवण आणि संध्याकाळी लग्न लावल्यावर त्या रम्य वातावरणात बसून काढलेलं फॅमिली फोटो अफलातून आले आहेत. संध्याकाळी सर्वांना वडापाव आणले त्यामुळे सर्व खुष झाले. त्यात आरु ला थोडस डोक्याला लागलं आणि रक्त आलं त्यामूळे थोडा वेळ वातावरण सिरीयस झालं.
मग रात्री वरात तर खूपच जबरदस्त झाली. धनगर खेळ आणि विकासचा डान्सची खूप चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरी वर पोहणे, आर्या ला उडी मारायला शिकवणे, स्वराज ची भीती घालवणे,आर्यन, हर्ष आणि ओम ला विजय ने बुडवणे पाण्यात पकडा पकडी खेळलो. आबाच सर्वांवर लक्ष ठेवणे. दुपारी पूजा आटोपल्यावर अचानक क्रिकेट खेळायला सर्व जण तयार झालो. हा खेळ सर्वांना लक्षात राहील असा झाला.महिला आणि पुरुष एकत्र, नवरा बायको वेगवेगळ्या टीम मध्ये, लहान मूल मुली सुद्धा होती यात. गणेश भाऊजी आणि रूपा ताई ने केलेली कॉमेडी, ज्योती वहिनी ने माझी काढलेली विकेट. विजय ने केलेला गोंधळ, आणि मनीषा ने शेवटच्या बॉल वर सिक्स मारून जिंकवलेली match. या सर्व करत सर्व जण अगदी मोकळे होऊन एन्जॉय केलं. यानंतर महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजायला सुरवात केली. रात्री 9 वाजता तयार होऊन त्यांनी नवरा बायको सोबत अनेक फोटो काढले.
दुसऱ्यादिवशी सचिन दाजी, गणेश भाऊजी, किरण, विजय आणि सर्व चिल्लर गॅंग घेऊन परत पोहायला गेलो आणि खूप धमाल करून परतलो.
असा हा 4 दिवसांचा अदभुत विवाह सोहळा पार पडला. आणि ही बेस्ट फॅमिली का आहे हे सिद्ध झालं.
सर्व दाजींचं खूप खूप आभार.
--जयंत जगताप
Comments
Post a Comment