कर भला तो हो भला
*कर भला तो हो भला -1
कधी कधी कळत नकळत आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याची परतफेड कधी ना कधी होत असते. किंवा अस म्हणा कधी कधी आपल्याला माणुसकी दाखवणारे असे लोक भेटतात की आपण ही कोणाला ना कोणाला मदत करायला प्रेरित होतो.
माझ्या बाबतीत गेल्या 1 महिन्यात 2 वेळा असे प्रसंग घडले.
पहिला प्रसंग
नवीनच घेतलेली 2nd hand चारचाकी गाडी घेऊन ऐरोली कडून कोपरखैरणे कडे येत होतो. सोबत बायको आणि मुलगा होतेच. कोपरखैरणे रेल्वे undergornd ब्रिज मध्ये ट्रॅफिक लागले होते. हळू हळू पुढे सरकत असताना नेमकं right कॉर्नर घेताना गाडी बंद पडली.4-5 वेळा फुल्ल स्टार्ट देऊन पण गाडी चालू झाली नाही, उताराचा फायदा घेऊन गाडी थोडीशी एका बाजूला लावली आणि खाली उतरणार इतक्यात गाडी समोर 1 enfiled bike उभी राहिली आणि 1 रुबाबदार व्यक्ती उतरून आमच्याकडे येऊ लागला. मनात वाटलं हा पोलीस आहे आणि आता fine लावणार. इतक्यात तो जवळ पोहचला नी अदबीने विचारले गाडी बंद पडली काय? मी चाचपडत हो म्हटलं. त्याने अजून 1 2 प्रश्न विचारले आणि विचारले मी धक्का मारला तर 2nd gear मध्ये उचलू शकाल का? असा अनपेक्षित मदतीचा हात बघून मी भारावून गेलो. मी म्हटलं मी धक्का देतो तुम्ही उचला. आम्ही खाली उतरलो. मनीषा आराध्य ला घेऊन बाजूला उभी राहिली, त्या सद्ग्रहस्थाने अजून 1 bike वाल्याला विनंती करून धक्का द्यायला तयार केले. मग तो गाडीत बसला आणि आमच्या दोघांना धक्का द्यायला सांगून गाडी चालू केली. चालू केलेली गाडी घेऊन तसेच त्या बोगद्यातून बाहेर गेले आणि sbi बँक समोर गाडी उभी करून परत येऊ लागले. तो पर्यंत मी त्यांची एनफिल्ड हातात घेऊन पुढे जाऊ लागलो. मनीषा आराध्य कडेवर घेऊन चालत होती. एवढ्या गर्दीत आणि घाईत असताना त्या व्यक्तीने केलेली मदत अविस्मरणीय होती. त्यात ती जागा अशी होती की अजून 5 मिनिटं तसाच थांबलो असतो तर ट्रॅफिक जाम झाले असते आणि पब्लिक च्या रोषाला सामोरे जावे लागले असते. त्या सद्ग्रहस्थाचे नाव श्री. दत्ता शेळके. व्यवसाय टुरिस्ट वेहीकल्स.
------------------ *सोशल मीडिया चा फायदा* ----------
प्रसंग दुसरा
23 एप्रिल ला सकाळी धार्मिक कामानिमित्त नाशिक ला निघालो होतो. निघायच्या अगोदर सोबत रोख रक्कम असावी म्हणून जवळील atm सेंटर मध्ये गेलो. Atm सेंटर सेक्टर 7 व 8 मधील रोड वर आहे. पैसे काढले आणि घाई घाईत atm न घेताच निघून गेलो. माझ्या लक्षातही आले नाही की कार्ड विसरले आहे. 23 ला नाशिक ला गेलो आणि पुढील 3 दिवस धार्मिक कार्यक्रमात व्यस्त झालो. 3 दिवस अध्यात्मिक वातावरणात रमलो होतो. ना कोणते फोन घेतले आणि मेसेज बघितले. माझी खास जवळची माणसे म्हणजे आई वडील, बायको आणि मुलगा सोबतच होते. त्यामुळे कसलीच काळजी नव्हती. 3 दिवसांनी जेव्हा फोन बघितला तेव्हा अनेक कॉल येऊन गेले होते. त्यात खास मित्राचा म्हणजे सुजित गोळे चे 25 एप्रिल ला रात्री 26 ला सकाळी 3-4 कॉल येऊन गेले होते.
त्याला पहिला कॉल लावला तेव्हा त्याने विचारले तुझे atm कार्ड हरवले आहे का? मी माझं वालेट चेक केलं, बॅग चेक।केली, गाडीत बघितल तेव्हा कळलं माझं atm हरवलं आहे. मी हो म्हटलं. आमच्या गावाचा आमचा कॉमन मित्र मिथुन याने त्याला कॉल करून हे सांगितलं होतं. मिथुन च्या मित्राच्या म्हणजे हनुमंत धनावडे यांच्या स्टेटस वर माझं नाव असलेलं atm कार्ड चा फोटो होता नी लिहल होत सापडलं आहे. ते बघून मिथुन ने सुजित ला फोन केला. मग मला पण मिथुन चा मेसेज आला. मी मिथुन ला कॉल करून confirm केलं.
मग मुंबईत येऊन 27 ला सकाळी हनुमंत धनावडे यांच्या शिवसाई कलेकशन या कापड्या च्या शॉप वर गेलो. हे दुकान atm च्या बाजूलाच आहे. तेव्हा आणखीन नवीन माहीती समजली. ते atm कार्ड आणि अजून इतरांची 2 सापडलेली atm कार्ड, असे 3 कार्ड मोहन यादव या व्यक्ती ने त्यांच्याकडे दिली आहेत. जर कोणी आले तर त्यांना द्या अस सांगून.
मग मी मोहन यादव याना फोन करून धन्यवाद दिला. नंतर हनुमंत धनावडे यांचे आभार मानले. सोबत ती 2 कर्ड मी बँकेत जमा करण्यासाठी माझ्याकडे घेतली आणि निघालो.
अशाप्रकारे सोशल मीडिया, स्टेटस आणि एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव यातुन मला माझे atm कार्ड सही सलामत मिळाले आणि माझी इतर धावपळ वाचली.
धन्यवाद, मोहन यादव, हनुमंत धनावडे, मिथून गोळे आणि सुजित गोळे.
आपलाच जयंत जगताप
Comments
Post a Comment