बायको
---------------------------*बायको*---------------------
बायको म्हणजे नवऱ्यावर हक्क गाजवणारी. नवऱ्याचा बैल करणारी. घरातील काम करून घेणारी, ती बोलेल ते ऐकाचेच. तिचा शब्द शेवटचा. अस social मीडिया वर फिरणारे मेसेज बघुन वाटते. 😊पण खऱ्या आयुष्यात बायको, पत्नी, अर्धांगिनी असते ती पुरुषाची खरी साथीदार, आधार, सपोर्ट सिस्टिम.
बायको असते जी आई नंतर चविष्ट जेवण बनुवन देत असते. जस गाडीत ब्रेक, विमानातील पॅराशूट, जहाजातील life जॅकेट, तस संसारात बायको असते. जस ब्रेक शिवाय गाडी पळवू शकत नाही, life जॅकेट शिवाय जहाजात बसू शकत नाही, परशूट शिवाय विमान उडवणे म्हणजे धोका असतो, तसं बायको शिवाय संसार होऊ शकत नाही.
नवऱ्याचं मन मोकळं करण्याची जागा, कधी ओरडायची हक्काची व्यक्ती. बाहेर मित्रांनी उगाच हट्ट केला की बायको ओरडेल हा बहाणा तर जगात सगळीकडे चालतो.
कधी पुरुषाला इतर गाड्यांचा ब्रेक दाबायाची इच्छा झाली की हा ब्रेक fail होण्याची रिस्क असते मग पुरुष गॅप गुमान आपला ब्रेक सांभाळतो 😀😀.
तर अशी ही बायको असते, तिला सांभाळून जगणे म्हणजे खर जीवनात परमार्थ असतो.
जयंत जगताप.
Comments
Post a Comment