आशा आणि अपेक्षा
अनपेक्षित-
जीवन हे अनपेक्षित आहे. तुम्ही कितीही नियोजन करा, विचार करा, येणारी वेळ तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. अनपेक्षित घटना साठी तयार राहणे हे आपले काम आहे. त्या चांगल्या-वाईट दोन्ही असू शकतात. त्यातून पुढे जाणे ही आशा असते.
मला वाटते आशा आपल्याला जिवंत ठेवते. आशा ही क्षितिजावर दिसणाऱ्या मावळत्या सुर्या सारखी असते. तो उद्या उगवेल ही आशा असते, त्याला जबरदस्ती नाही करू शकत. मग ती अपेक्षा होते. अपेक्षा ही आपल्या मनाला हुरहूर लावणारी असते. आशा हिरारी देते, अपेक्षा हिरमोड करू शकते.
आशा नसेल तर निराशा येते पण ती स्वतापूरती असते. अपेक्षा पूर्ण झाली नाही की अपेक्षाभंग होतो आणि तो क्लेशदायक बनतो.
तुम्ही कोणाकडून आशा ठेवा, अपेक्षा ठेवलीत की जास्त अधिकार गाजवला जातो.
आशा आणि अपेक्षा बहिणी नाही तर सासू-सून अशा आहेत असं मला वाटत.
धन्यवाद
Comments
Post a Comment