करून दाखवणे गरजेच आहे

 तस आपल्या मराठी लोकांना शिकवण असते की  काम करायचं आणि विसरून जायचं. एका हाताने करून दुसऱ्या हाताला कळू नाही द्यायचं. अगदी आपला इतिहास पण इतका दैदिप्यमान आहे पण कोणी तो लिहून नाही ठेवला म्हणून आज आपल्याला इंग्रजांनी संग्रहित केलेलं कागदपत्रे अभ्यासून आपला इतिहास माहिती करावा लागतो. 
असो.. 20व्या शतकात व्हिडिओ आणि फोटो ग्राफी नव्हती त्यामुळे असे अनेक किस्से संग्रहित नव्हते. 
आता फेसबुक इन्स्टग्राम, युटूब व्हाट्सअप्प वर अनेक असे विडिओ असतात की त्यात अनेक प्राणी, व्यक्ती जीवावर बेतलेल्या परिस्थितीत असतात आणि त्यातून त्यांना काही सज्जन व्यक्ती माणुसकी दाखवून बाहेर काढतात. असले विडिओ प्रसिद्धीसाठी नसून त्यातून इतरांनी प्रेरणा घेऊन समाजात आपणही काही सत्कार्य करू शकतो ही भावना जागृत करणे ही असते. 
आजकाल अनेक जण म्हणत असतात कोण कोणाला मदत करत नाही लोक स्वार्थी झाली आहेत. अशा नकारार्थी मानसिकतेला बदलण्यासाठी असे विडिओ बनवणे गरजेचे आहे. 
आणि हो अशी कार्य करताना कधी कधी आपण ही त्यात अडकू शकतो, म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असे विडिओ गरजेचे असतात. 
धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)