कर भला तो हो भला भाग - 3

*कर भला तो हो भला भाग - 3*
दारू वाईट की चांगली या विषयात जायचं नाही आहे. ते पिणाऱ्या व्यक्ती ला माहीत असते तो का पित आहे. पिऊन डोक्याला झिंग येते हे खरं आहे. माणूस स्वतःवरचा ताबा सोडतो आणि कधी कधी जास्त झाली की रस्त्यावर पडतात. दारू पिला की न पिणारे त्याचा तिरस्कार करतात. पण तो पण माणूस आहे हे विसरून कसे चालेलं. याचच भान ठेवून काल छोटस सत्कार्य केलं. 
 कोपरखैरणे रेल्वे स्टेशन च्या अंडर ग्राउंड बोगद्यातून गाडी घेऊन येत होतो, बोगद्यात थोडं ट्राफिक जाम झालं होतं. तसा बोगदा फक्त येणाऱ्या जाणाऱ्या 2 गाड्या जातील एवढाच आहे. हळू हळू पुढे आलो तसं दिसलं रस्त्यावर 1 माणूस पडला होता. गाड्या त्याला चूकवुन पुढे जात होत्या आणि त्यामुळे दोन्हीकडे जाम लागले होते. मी जसा जसा त्याला क्रॉस करत होतो माझं मन हेलावत होत. जरी याने दारू पिली असली तरी याला अस सोडणं योग्य नाही. चुकून कोणाचे गाडीचे चाक अंगावरून किंवा डोक्यावरून गेले तर जीवाला मुकेल. 
मी बोगद्यातून बाहेर कोपरखैरणे side ला आलो,  गाडी बाजूला पार्क केली आणि निघालो. इतक्यात पार्किंग वाला आला आणि गाडी लावू नको बोलला. मी त्याला इथे गाडी का लावली आहे ते सांगतले आणि त्यालाही सोबत यायची विनंती केली,  तो बोलला बेवडा है छोड दो, मी म्हटले तुम मत आवो मै एकेला जायेगा. आमचे हे बोलणे बाजूला bike बसलेल्या एका तरुणाने ऐकले. आणि तो स्वतः माझ्यासोबत यायला तयार झाला.मग आम्ही दोघे मिळून बोगद्यात जाऊन त्या पिलेल्या व्यक्ती ला बाहेर आणले आणि सुरक्षित ठिकाणी झोपवले. आणि आपल्या मागर्स रवाना झालो. मदतीला आल्याला त्या भल्या तरुणाचे नाव राजेश होते. 
या कृतीं ने आम्हा दोघांना एक सत्कार्य (भले) काम केल्याचे समाधान भेटले. सामाजिक भान अजूनही आपल्यात आहे हे समजले आणि महत्वाचे ट्रॅफिक कमी झाले. त्याला आणता आणता त्याला 1-2 प्रश्न विचारले तर समजले तो राहायला महापे गावात आहे आणि त्याचे मुळगाव संभाजीनगर आहे. वाचकांना योग्य प्रकारे समजण्यासाठी एक छोटासा विडिओ बनवला आहे, तो सोबत देत आहे. 
मागे मला एकदा अशीच बोगद्यात मदत भेटली होती त्याच आज मला थोडी परतफेड करता आली याचे समाधान खूप मोठे असते हे जाणवले. 
धन्यवाद
जयंत जगताप 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)