1 जुलै 2019 व्यस्त आणि challanging दिवस

1 जुलै 2019 व्यस्त आणि challanging दिवस

पाऊस थांबत नव्हता आणि पाऊस थांबवा म्हणून आम्हीही थांबत नव्हतो.

पावसाळा सुरू झाला होता आणि जुलै चा मुसळधार पाऊस मुंबईत पडत होता.
नेहमी प्रमाणे आराध्य काल रात्री उशिरा म्हणजे पहाटेच म्हणू शकतो 2 वाजता झोपला.
1 जुलै ला संध्याकाळी 5 वाजता मला साईट वर जायचे होते.

आम्ही सकाळी 9 ला उठलो अंघोळ आणि नास्ता केला.  आरुला नास्ता करायला आणि औषधे द्याला 1ते 1:30 तास जातो, 12 वाजता मधवप्रिया मध्ये माझी आणि मानीषाची अपॉइंटमेंट होती तिथे कमीत कमी 1 तास लागतो मग नंतर 3:30 ला ब्राह्मण समाज मध्ये अरुची स्पीच ची अपॉइंटमेंट  तिथे 1:30 तास जातो मग 5:30 ला अरुची ओकपेशनल थेरेपी होती तिथे 1:30 जातो. हे सर्व व्यस्त कार्यक्रम आणि त्यात मुसलधार पाऊस चालू होता.

मनीषाने सकाळीच नास्ता बरोबर दुपारचे जेवणाचे भाजी आणि भात तयार करून ठेवला, तिने नास्ता केला  व मी तिला मधवप्रिया मध्ये पुढे जायला सांगितले नंतर मी जाईन  व ती घरी येईल असे ठरवले होते.  मी आरुला अंघोळ घातली व नास्ता भरवून औषधें देऊन मम्मी कडे ठेवला व मधवप्रियत गेलो. तिथे गर्दी नव्हती पण एक नवीन पेशन्ट आत होते, मनीषाची तपासणी झाली होती व ती माझ्यासाठी थांबली होती, इतक्यात मम्मी चा फोन आला की आरु रडत आहे.  मनीषा घरी जायला सांगितले व मी डॉक्टरकडे थांबलो, निषा धावत चालत मम्मी कडे पोहचली, आरुला घेऊन घरी जाणार म्हणून चावी शोधू लागली पन चावी माझ्याकडेच राहिली होती. मम्मी कडे थांबण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. माझी तपासणी करून औषध न घेताच मी चालत चालत घरी पोहोचलो. औषध संधकाळी साईट वर जाताना घ्याचे ठरवले.  तिकडून मनीषा घरी आली. 2:30 वाजले होते व 3:15 ला घाटकोपर ईस्ट ला पोहचायचे होते.
पटापट तिने भाकरी बनवली, तिघात आम्ही 1 भाकरी खाल्ली थोडा भात खाल्ला व मुसळधार पावसात परत निघालो, पाऊस असल्यामुळे रिक्षा पण लगेच मिळत नव्हत्या. थोडा वेळ शोधून एक रिक्षाचालक थांबला. ब्राम्हणसमाज मध्ये पोहोचलो पण अगोदरचा मुलगा अजून आत मध्येच होता. आता इथे उशीर झाला की पुढे ओकपेशनल ला उशीर होणार होता. काशीतरी 3:35 ला थेरेपी चालू झाली व 4:05 ला संपली.
आता घरी येऊन आरुला अजून थोडे भरऊन ओकपेशनल ला जायचे होते. आता मनीषा तिकडे जाणार व मी नंतर औषधें घेऊन साईट वर जाणार असे ठरवले. पाऊस खूप पडत होता व मला मैत्री पार्क वर 1 तास उभे राहावे लागेल म्हणून मग मानिषाला व आरुला थेरेपीला पुढे जायला सांगितले व मी थोडयावेळाने साईटवर निघालो.
असा हा 1 जुलै चा दिवस आमच्यासाठी खूप व्यस्त होता व challanging होता, पण आम्ही सर्व टास्क पूर्ण केले व यशस्वी झालो.
या सर्व धावपळीत आरुने सुद्धा खूप धैर्य धाकवले व दोन्ही थेरेपी छान करून आमच्या मेहनतीला सार्थकी लावले.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)