अंदमानातील सातारकर

           *अंदमानातील सातारकर*
अंदमान म्हटले की आपल्याला आठवतात ते वीर विनायक दामोदर सावरकर. त्यांची जन्मठेप, त्यांनी चालवलेला कोलू. 8 बाय 5 फूट ची अरुंद कोंदड बराक, त्यातच करावे लागणारे सर्व प्रातः विधी. आणि होणारे अनन्वित अत्याचार. हे सर्व सावरकरांना लागू होते कारण ते राजकीय कैदी म्हणून तिकडे नेले होते. असच इतर दरोडे खून करणारे कैदी ही तिकडे नेले जायचे, त्यांना पण अशीच कठोर शिक्षा असायची का? तर काही अंशी नाही. सावरकर आपल्या बौद्धिक क्षमतेने तिथेही उठाव करतील अशी भीती होती म्हणून त्यांना इतर कैद्यांपासून अनेक वर्ष अलिप्त ठवले होते, इतके की त्यांचे मोठे बंधू तिथे होते हे ही त्यांना खूप उशीरा समजले. 
पण इतर कैद्यांना काही काळानंतर तिथे इतर कामे दिली जात. जसे की, शेती, रस्ते, घरकाम, सुतार, गवंडी अशी अनके प्रकारची मेहनती ची कामे करून घेतली जात. 

असच 1930 च्या काळात आपल्या जिल्ह्यतील जावळी तालुक्यातील कुडाळ जवळील डुईकर वाडीतील एक डुईकर नावाचा व्यक्ती मुंबईला चुकून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सापडतो. त्याची रवानगी होते अंदमानात. खुनाची शिक्षा असल्यामुळे त्याला काही वर्षे तुरंगात ठेवून तिथेच शेती चे काम लावले जाते. काही वर्षांनी तो सुटतो पण त्याला परत देशात येण्यास बंदी असते. हीच त्याची शिक्षा असते. कालांतराने तो तिथे लग्न करतो, मुलबाळ होतात आणि तिथेच स्थायिक होतो. त्याची मुलगी मोठे होते तेव्हा उच्च शिक्षणासाठी मुंबईला येते. तोपर्यंत भारत स्वतंत्र झाला होता पण हा तिकडेच शेती घेऊन स्थायिक झाला आणि अंदमान ही भारतात राहिले. मुलगी येताना वडील तिला सांगतात आपलं गाव सातारा जिल्ह्यात आहे. तिथे जा, माझे भाऊ तिथे राहतात तुझे भाऊ बहीण तिथे भेटतील त्यांना भेट. ती मुलगी मुंबई ला येते, आवर्जून आपल्या वडिलांच्या जन्मभूमीला भेट देते. 
एक सातारकर अशा प्रकारे अंदमानकर होऊन जातो. 

धन्यवाद
जयंत जगताप 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)