दारुड्यांचे कोर्ट

                    *दारुड्यांचे कोर्ट*
दारू पिणारे किती महत्वाचे असतात हे आपल्याला कोरोना काळात समजलं आहे. फक्त दारू पिऊन अर्थव्यवस्था नाही तर यांनी यामुळे कमी टेन्शन घेतलं आणि कोरोना काळात अनेक जण या उपायांमुळे वाचलेही. ते म्हणतात ना दारू कमी आणि कधीतरी घेतली तर औषध असते तसच ती कुठे घायची हे ही महत्वाचे आहे. आपल्या देशात तर कायदा आहे तुम्ही रस्त्यावर, गाडीत, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ शकत नाही. अशीच एक खरी घटना जी माझ्या वयस्कर मित्रांसोबत घडली त्याची ही गोष्ट. आता त्यांचे वय 50 च्या वर आहे. 
  2010-11 ची गोष्ट आहे. संध्याकाळी ऑफिस काम करून दोघे दिल्लीतील एका दारू दुकानात जाऊन दारू घेतात आणि लगेच संपवून घरी जायचे अस ठरवून गाडीत बसून पेग बनवतात. एखादा पेग झाला असेल इतक्यात समोर हवालदार येतो आणि यांचे ग्लास बघून दोघांचे चलांन बनवतो. तेव्हा ते जास्त गांभीर्याने घेत नाहीत पण दुसऱ्यादिवशी जेव्हा मेंदू पूर्ण ताजातवाना होतो तेव्हा ते हडबडतात. कारण लवकरच परदेशात जायचे असते आणि त्यासाठी तेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन घ्यायचं असते. तो चलान चा कागद घेऊन 2 दिवसात जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जातात, पण तिथे समजते ते चलान आता कोर्टात जमा केले आहे. हवालदार सांगतो संधकाळी 5 वाजता जा आणि दंड भरून चलान बंद करा. दोघे पोलीस स्टेशन मधून बाहेर येतात मग विचार करतात 5 ला तर कोर्ट बंद होत मग तेव्हा जाऊन काय करायचे. त्यांना वाटत हवालदार चुकून अस बोलला असेल असं समजून हे ऑफिस ला अर्धा दिवस सुट्टी टाकून 1 वाजताच जातात. कोर्टात इकडे तिकडे फिरून एका ठिकाणी आपल्या नंबर ची वाट बघतात पण नंबर काही येत नाही. संधकाळी काळी त्यांना समजते, मुख्य कोर्टचे काम संपले की 5 नंतर जज दारुड्यांचे कोर्ट घेतात. 
  या कोर्टात नंबर नुसार रोज 50 दारुडे एक line मध्ये उभे करून (म्हणजे जे येतात तेच) त्यांना जज दंड सांगतो, तो भरायचा. जर त्याला विरोध केला तर दंड वाढवला जातो किंवा 8 दिवस तुरंगात हि जावे लागते. आणि हो जो पर्यंत सर्व पन्नास जणांना शिक्षा दिली जात नाही तोपर्यन्त सर्वांनी तिथेच रांगेत उभे राहायचे. खरी गोम तर अशी की शिक्षा देऊन जज गेले की, ते चलांन बंद करणारा लेखपाल जेवढी शिक्षा असेल त्यावर हजार रुपये जास्त घेणार. 
 चार पाच दिवस सतत जाऊन शेवटी या दोघांचा नंबर आला, त्या बेवड्यांच्या कोर्टात पाच नंतर 2-3 तास उभे राहून, जज ने प्रत्येकी 2000 दंड देऊन लेखापाल कडे प्रत्येकी 3000 जमा करून यांनी चलान बंद केले आणि परदेश दौरा पार पाडला. आणि आता तर हे दोघे गाडीत बसून इतके घाबरतात की, कोणी प्लॅन केला तर हे जातच नाहीत. 
तर असे हे बेवड्यांचे कोर्ट असते ते ऐकून नवीन माहिती समजली. 

जयंत जगताप
7738022343

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)