रवी रांजणे
💐💐💐💐💐*कर्मवादी*💐💐💐💐💐
कर्मवादी जे असतात त्यांनी आपले कर्म करत राहायचे असते. सत्कर्म हे जमिनीत पेरलेल्या बीजसारखे असते, त्याला योग्य ओलावा भेटला की ते उमलून वर येतेच. असेच सत्कर्म करत आपले कर्म करणारे *इंजिनीयर श्री. रवी रांजणे साहेब* आज समाजकार्यात चमकत आहेत. बी. जी. शिर्के या मोट्या बांधकाम व्यवसाय कंपनीत स्वतःच्या हिमतीवर मोठ्या पदावर मजल तर मारलीच सोबत कंपनी चा व्यवसाय वाढवण्यात सहकार्य करत आहेत.
यासोबत सामाजिक जाणिव ठेवुन भागातील अनेक होतकरू तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसाय संधी उपलब्ध करून देत आहेत.
*सुजित गोळे, नितीन रांजणे* यासारखे युवा उद्योजकांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक तरुणांना क्लब, बी जी शिर्के कंपनी मध्ये त्यांच्या योग्यतेनुसार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
अशा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जनमानसात वावरणाऱ्या, मितभाषी असणारे, सुसंस्कृत असे राहणीमान असणाऱ्या रवी रांजणे साहेबांचे करावे तेवढे कौतुक कमीच.
अशीच आपली प्रगती होत राहो आणि आपल्या हातून सामाजिक कार्य घडत राहो या शुभेच्छा.. 💐💐
Comments
Post a Comment