1 जून सबका जन्मदिन

   *जीसका दिन पता नही उसका 1जून होता है* 
हिंदीत एक म्हण आहे, "जीसका कोई नही होता उसका भगवान होता है" असच आजच्या दिवसाच महत्व आहे. जीसका कब जन्म दिन है पता नहीं होता उसका 1जून होता है. 
वाढदिवस साजरे करणे, मग सगळ्यांच्या तारखा लक्षात ठेवणे, रात्री 12 ला जागून शुभेच्छा देणे नाहीतर दोस्ती तुटली, स्टेटस नाही ठेवले तर दुश्मनी झाली म्हणून समजा. केक घेऊन गेले म्हणजे त्याच्या संकटात धावून गेलो असा अविर्भाव असतो मित्रांचा. लाखो दिल की धडकन, युवा नेते ही विशेषणे लावली नाहीत तर जन्मदिन सुका होता.  हे आजकाल चे नवीन फॅड आहे. 
 मोबाईल युगापुर्वी असले काही उद्योग नव्हते. आम्ही शाळेत असताना काही high फंडू मुलं-मुली चॉकलेट आणून वर्गात वाटत असत, नवीन कपडे घालून येत असत. आम्ही गपगुमान चॉकलेट खाऊन बसायचो. आपला वाढदिवस आला की सुट्टी मारायची आणि घरी मज्जा करायची नाहीतर शाळेत गेलं तरी कोणाला माहीत नसायचं वाढदिवस आहे ते. 
असो आमच्या आधीच्या पिढया तर जेव्हा शाळेत दाखल होत असत तेव्हा गुरुजी विचारत जन्म दिनांक सांगा, आई-वडिलांना काही माहीत नसायचं.  काही काही जणांच्या तारखा जुन्या कौलारू घरातील माळ्याच्या आडव्या खांबावर लिहलेल्या असत. ज्यांच्या तारखा माहीत नसतं मग त्यांच्या तारखा लिहल्या जात 1जून  आणि अंदाजे आठवेल ते वर्ष टाकले जाई. 
आज असे 1 जून जन्मदिवस वाले अनेक जण पन्नाशी च्या पुढे पोहचले असणार यात शंका नाही. अशा सर्व जन्मदिवस वाल्या आईवडीलधाऱ्या जेष्ठ लोकांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा

जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)