भूमिका
भूमिका
जीवनात भूमिका खूप महत्वाच्या असतात. वेळ आणि काळानुसार त्या बदलत जातात. कधी स्वतःहून घेतो, कधी दिलेल्या स्वीकारतो, कधी लादल्या जातात तर कधी नकळत त्यात आपण घुसतो. भूमिका आपण निभावत असलेली कामगिरी, मला वाटत भूमिका 2 प्रकारच्या असतात. जी आपण स्वतः ठरवून भूमिका वठवतो त्याला म्हणतात स्टँड. कधी कधी लोक विचारतात या प्रसंगात तुझा स्टँड काय? आणि जे दुसरा व्यक्ती, जसे आपला कार्याचा प्रमुख, किंवा नेता, लीडर आपल्याला एक भूमिका पार पाडायला देतात त्याला रोल म्हणतात.
म्हणजे एखाद्या सामूहिक मोहिमेत, युद्धात, मोठया प्रकल्पात प्रत्येकाला एक जबाबदारी असते, त्यांनी ती निभावताना एक भूमिका पार पाडायची असते. जस की आताच चन्द्रयान-3 मोहीम पार पडळीं त्यात प्रत्येक शास्त्रज्ञांनी एक भूमिका पार पाडली. तो त्यांचा रोल होता. मोहिमेचे यश या प्रत्येकाच्या रोल वर अवलंबून होत.
वयक्तिक स्टँड म्हणाल तर गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांनी घेतलेली भूमिका. ती स्वतः घेतली जाते मग त्यात सहकारी जुडले जातात.
अजून एक उदाहरण म्हणजे अफजल खान वध.
भेटायला गडाखाली ज्यायचे ही महाराजांनी घेतलेली भूमिका (स्टँड) त्याने इतिहास घडला आणि नंतर जे सर्व सरदार आणि मावळ्यांनी दैना उडवली तो त्यांचा त्यांना दिलेला रोल होता. दिलेली भुमिका.
भूमिका ही प्रत्येकाला निभवावी लागतेच. कधी फसते कधी यशस्वी होते. कधी परत परत तीच करावी लागते आणि कधी कधी काही क्षणांची भूमिका अजरामर होऊन जाते.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment