पसायदान निमित्ताने हे विसरू नका

पसायदान
ध्न्यानेश्वर माऊली म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा.. संपूर्ण महाभारत सोप्या शब्दात लिहून शेवटी जीवनाचा गाभा, तत्व, जसा अर्क काढतात तसा जीवनाचा अर्क पसायदान मधे सांगितला आहे. 
त्यानिमित्ताने मला इथे उपस्थित रहायची संधी भेटली हे माझे भाग्यच.. 
कविता.कॉम च्याच पहिल्या कार्यक्रमाला मी इथे आलो होतो. त्यानंतर परत उपस्थित राहणं जमले नाही पण दुरून प्रवास बघत होतो.. समृध्दी हायवेवर ज्याप्रकारे गाडी धावत असते त्याप्रकारे कविता. कॉम आणि शिव तुतारीचा प्रवास वेगात सुरू आहे आणि या दोन्ही प्रतिष्ठान चे स्टिअरिंग सुरक्षित हातात आहे त्यामुळे प्रवास असाच सुरू राहणार यात शंका नाही. 
अनेक वेळा मला कविता. कॉम मध्ये कविता सादर करण्याचा मोह झाला. पाटील सरांशी बोलून ते करता देखील आले असते पण ओळख लाऊन येणे आणि संधी घेणे मनाला पटले नाही. 
मग यावेळी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रीतसर नावे द्यायची होती आणि मग इथे निवड होणार होती. तिथून इथे यायची संधी भेटली त्याचा आनंद वेगळाच.
धन्यवाद.
माझी कविता सादर करतो. 

*हे विसरू नका*
लहानपणी घरातून बाहेर निघताना आई नेहमी सांगायची, सोबत घेतलेली छत्री विसरू नको, जेवणाचा डब्बा विसरू नको.. आता बायको कामांची यादी देते आणि निघताना म्हणते काहीच विसरू नका.. 
हे विसरू नका ते विसरू नका.. नक्की काय काय लक्षात ठेवायचे .. मग मला सुचले जीवनात आपण काय विसरले नाही पाहिजे.. ते मी इथे कवितेच्या माध्यमातून सादर करत आहे. 
कवितेचे शीर्षक आहे 
              *हे विसरू नका*
     नेहमीच सुखाच्या शोधत धावू नका. II 2 ||
नेहमी रस्ता चांगलाच असला पाहिजे हा अट्टाहास धरू नका..         
  हिरवेगार रस्ते, सावली देणारी झाडे,
 यात जमेल इतकं नक्कीच चला, पण....पण... 
तोच रस्ता आयुष्यभर असेल असं गृहीत धरू नका. २||
 चढ-उतार, खळगे, अवघड वळणे आणि घाट, 
            यात ही स्वतःला सिद्ध करा... 2||
कधी कधी रस्ता संपला अस वाटेल, तेव्हा..
स्वतः नवीन वाट तयार करण्याची संधी चुकवू नका.. २||
   भौतिक सुखाच्या मागे, आपला वेग इतका ही वाढवू नका की,
जेव्हा  माघारी फिरण्याची गरज पडेल तेव्हा वळता येणार नाही..
  रुक्ष, परिस्थितीने तापलेले, कठीण रस्ते ओलांडत,
     जेव्हा सुखाची विहीर सापडते तेव्हा. 2||
. तेव्हा भेटलेले आनंदाचे पाणी सर्वात जास्त गोड लागते,
                   हे विसरू नका.. 
  आणि हो सोबत अनुभवाचे गाठोडे असलेले, 
आपले जुने जाणते आपले सोबत आहेत.. ||2||
 तोपर्यंत... तोपर्यंत कोणतही संकट आपल्याला तोडू शकत नाही
हे विसरू नका..हे विसरू नका.. 
धन्यवाद.. 
  कवी जयंत जगताप
   7738022343
मु. पोस्ट कोपरखैरणे नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)