संग्राम जगताप प्रतिक्रिया


     *संग्रमदादा जगताप प्रतिक्रिया.* 
2011-12 ची गोष्ट असेल. कर्नाटकमधून हुबळीवरून एक सिमेंट प्लांट मध्ये सर्विस विजिट करून परत मुंबईला येत होतो. मला सहसा रेल्वेने प्रवास करायला आवडते. तिकीट बुक केले होते पण अजून निश्चित झाले नव्हते. वेटींग वर होते तेव्हा इतके digitalization नव्हते. तरी कन्फर्म होईल या आशेवर मी हुबळी स्टेशन वर पोहचलो. तिथे काही वेळ थांबल्यावर रेल्वेचा मेसेज आला चार्ट रेडी झालं असल्याचा. माझं तिकीट कन्फर्म झाले नव्हते.मुंबईला तर जायचे होते. तिकीट काउंटर la जाऊन एक जनरल तिकीट काढले आणि जी पहिली गाडी येईल त्यात चढून जायचे असे ठरवले. अर्ध्या तासात प्लॅटफॉर्म वर नागरकोईल मुंबई रेल्वे आली त्यात स्लीपर कोच मध्ये चढलो. सहसा ऑफ सीझनला अशा कोच मध्ये एखादी सीट खाली भेटते मग आपण टीसी येईपर्यंत वाट बघायची. टिसी पावती देऊन जे भाडे असेल ते घेऊन सोबत extra 100 रूपये घेऊन तिकीट द्यायचे. टीसी येईपर्यंत त्या स्लीपर कोच मधील साईड lower सीट वर मी बसलो. तिथे एक पंचविशीतला मुलगा बसला होता. त्या कोच मध्ये चढल्या चढल्या मला एक विचित्र वास येत होता. हळूहळू तिथे सेट झालो की समजले हा मच्छीचा वास आहे. मी बसलेलो त्या सीट वरील मुलाची कुरकूर सुरू होती. अगोदर मला काही समजत नव्हते हा इतका अस्वस्थ का झाला आहे. मी त्याला म्हटले भाई रुक थोडा टीसी आयगा तो मैं जायेगा. त्यावर तो पुटपुटला "तुमलोग हमे देते हो क्या ऐसी जगा. जाओ इधर से." इतक्यात समोरच्या सीट वर बसलेली मध्यम वयाची बाई त्याला ओरडली, रोद्रिझ चूप बैठं. 
मग तो गप्प झाला. 
अगोदर मला तो अस काय बडबडतोय ते समजले नाही. मग माझं निरीक्षण सुरू झालं. तो अक्का डब्बा एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी भरलेला होता. ते सगळे केरळ मधून एका धार्मिक स्थळाला भेट देऊन आले होते. ते सगळे वसई भागातील होते. त्यांनी गळयात क्रॉस चे चेन घातले होते. सर्वजण बऱ्यापैकी थकले होते पण अनेकांची नजर माझ्याकडे खिळायची. मी तर फुल्ल डेअरिंग ने वागणारा होतो पण त्यावेळी थोडा सावध देखील झालो होतो. त्यातल्या त्यात थोड्या समजदार व्यक्तीशी मी संवाद सुरू केला. त्याने मला वरील माहिती दिली. थोडी वेळाने त्यांनी सगळ्यांनी मच्छी, चिकन असे मांसाहारी जेवण काढून खायला सुरवात केली होती आणि पूर्ण डब्यात एक विशिष्ट वास सुटला होता.  आणि माझे डोक्यात ही लोक डोक्यात काय विष घेऊन आले आहेत याचे विचार सुरू होते. 
ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे. आमदार संग्राम जगताप यांनी फक्त एक धर्माने दिलेल्या चिथावणीला प्रत्युत्तर दिले तर त्यांना धर्मांध ठरवले जात आहे. पण या इतर धर्मात नेहमीच्या, रोजच्या उपदेशात धर्मांध विषारी विचार डोक्यात रुजवले जात आहेत. त्यातून जो समाजाचा विनाश होत आहे याकडे या कथित धर्मनिरपेक्ष, लिबरल लोकांनी कानाडोळा केला आहे. हिंदुनी फक्त प्रत्युत्तर दिले तरी यांना इतका त्रास होत आहे. 
त्यामुळे संग्राम जगताप जे प्रत्युत्तर देत आहेत ते बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही धर्मांधपणा थांबवा, प्रत्युत्तर बंद होईल. 
संग्राम दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)