कोजागिरी पौर्णिमा
*कोजागिरी पौर्णिमा*
दिवाळीची असते पहाट, गुडी पाडव्याच्या सकाळ, दसऱ्याची सायंकाळ आणि कोजागिरीची रात्र.. आहे ना कमाल.. आपले सण किती धमाल..
प्रत्येक वेळेला आहे महत्व... ||2||
कधी सूर्य, कधी चंद्र कधी झाडे फुले पूजून जाणतो आपण निसर्गाचे तत्व.. >>
कोजागिरी आहे अशीच खास पौर्णिमेची रात्र ||2||
देवी लक्ष्मी झाली प्रकट, म्हणून होई कौमुदी पौर्णिमा साजरी सर्वत्र..
कोण आहे जागे, कोण आहे जागे... अस विचारात सर्व आनंदात बाहेर फिरती II2II
मोकळ्या आकाशी, चंद्राच्या सफेद प्रकाशात सर्वजण अमृतमय दूध पिती.
जो जो जागा त्याच्या घरी लक्ष्मी करी निवास ||2||
आणि गोपाल कृष्ण गोपीकासंगे आजच्या रात्री खेळतात महारास..
चंद्र येई पृथ्वी भेटी..||2||. सर्व भक्त अमृतप्रकाशी न्हाऊन निघती.. ||2||
पिके निघायची ही खरी सुरवात.. शेतकरी राजा आनंदून जाई चंद्राच्या प्रकाशात... ||2||
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.
*कवी जयंत जगताप*
मोबाईल नंबर 7738022343
ठिकाण कोपरखैरणे
Comments
Post a Comment