raise your own Bar
Raise your own Bar
आपल काम असत लिहित राहायचं. त्याच्यातून कधी चांगलं निघेल हे वाचक ठरवत असतात. असच कविता. कॉम आयोजित काव्यस्पर्ध्येत एक स्वयंरचित कवितेचा व्हिडिओ पाठवला होता. कविता.कॉम अतिशय नियोजनबध्द असे काम करत असतें 3 वर्षात 78 कार्यक्रम म्हणजे वर्षाला 26 आणि प्रत्येकी महिन्याला 2 असे जबरदस्त वेग ठेऊन कार्य करणारी ही संस्था कमी वेळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. योगायोगाने पहिला प्रयोग आणि परवा 78 प्रयोग असे दोन कार्यक्रम मला हजर राहून बघता आले. 78व्या प्रयोगात आदरणीय लेखक, कवी, समीक्षक, अभ्यासक आणि बरेच काही असे अशोक बागवे साहेब यांनी पसायदान cha अर्थ असा काही समजावला की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले. सोबत निमंत्रित हरिभक्त पारायण महाराजांचे सत्कार व आमच्या सारख्या कवींचे बक्षीस देऊन सन्मान झाला. ऑफिस काम अर्धे सोडून कार्यक्रमास आलो होतो आणि वेळेअभावी इथूनही अर्ध्यातच जावे लागले. माझ्या कवितेला उत्तेजनार्थ असे सन्मानपत्र देण्यात आले ते तिथे बागवे सरांकडून घेऊ शकलो नाही. पण कविता.कॉम चे सर्वेसर्वा आदरणीय प्राध्यापक श्री.रवींद्र पाटील सरांनी शाळेत बोलावून ते मला सन्मानित करून दिले.
शाळा म्हणजे आपला जिवाभावाचा विषय. गेट मधून आत जाता जाता उजव्याबाजूला प्रदर्शनीय भिंतीवर खलील सुविचार लिहला होता आणि तिथेच उभे राहून सन्मानपत्र घ्यायचे असे सराना विनंती केली.
सुविचार असा होता.
"प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेत असते, म्हणून कोणीतरी मोठ झालं की त्यांचा हेवा करण्यापेक्षा त्यांचाकडून शिकण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या मेहनतीला सलाम करा आणि स्वतःही मेहनत करा."
सुविचार अगदी मनाला भिडला. कारण गेले काही दिवस मी याच सुविचाराच्या भोवती विचारविनिमय करत आहे. कौतुक करणे खूप महत्वाचे असते.. दुसऱ्यांवर टीका करून, त्यांचे दोष शोधून आपण मोठे होत नसतो, आपले दोष लपत नसतात. आपल्याला मोठे व्हायचे असेल तर स्वतः मेहनत करणे, कृती करणे गरजेचे असते. यावर मोटिवेशनल speech म्हणून मी माझी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच बनवून ठेवले आहे.
तर अशा अनेक विचारांची नाळ जुडत गेली आणि हा लेख बनत गेला.
धन्यवाद कविता.कॉम, शिवतुतारी प्रतिष्ठान
आपलाच
जयंत जगताप
Comments
Post a Comment