माझं काम आणि माझे छंद

        माझं काम आणि माझे छंद 

गेल्या 18 वर्षात मी पूर्ण देश भ्रमण कधी कधी परदेश दौरे करत पॉवर प्लांट, सिमेंट प्लांट, स्टील प्लांट, sea पोर्ट,  कधी कधी सिगारेट बनवणाऱ्या कंपन्या, ऑइल रिफायनरी हे प्लांट खूप बघितले आणि इथे काम केले. हे आमची कर्मभूमी.
कोळसा, सिमेंट, iron ore, (क्लिंकर, slag, ash, lime stone) सिमेंटचे रॉ मटेरियल) मोजणाऱ्या मशिन्स जशा की weighing scales, metal detector, कोल फिडर, बंकर लेवलवर खूप काम केलं. 
 खाणीतून काढला जाणारा, परदेशातून जहाजातून येणारा, रेल्वेने प्लांट मध्ये येणारा कोळसा, यार्ड मधे साठवलेला कोळसा बॉयलर मध्ये पाठवताना, आणि तो जळाल्यावर निघणारी त्याची राख(फ्लाय एश) अशा सर्व स्तरावर ते मोजण्याचे काम, योग्य रित्या बॉयलर मध्ये पाठवण्यासाठी लागणारे मशिन्स इंस्टॉल करणे, ते मेन्टेन करणे हे आमचे काम. त्यामुळे सतत कोळसा खाणी, पॉवर आणि स्टील प्लांट मधील chp (coal handling plant) stacking एरिया, सीमेंट प्लांट मधील raw material ते  सीमेंट पॅक करे पर्यंत सगळीकडे आमचे मशिन्स, स्टील मध्ये iron ore मोजने, समुद्री पोर्ट वर येणारे - कोळसा, युरिया, इतर मिनरल मोजणे. 

 कोळसा नसेल तर कशाप्रकारे देश अंधारात जाऊ शकतो, स्टील, सिमेंट ची गुणवत्ता किती महत्वाची हे समजले. 
कोळसा ब्लॅक गोल्ड आहे हे समजले. मग भाग मिल्खा भाग मधील कोळसा चोरताना वाजणारे गाणे, "कोयला काला है... चट्टानोने पाला है... अन्दर काला, बाहर काला पर सच्चा है साला" हे आपले आवडते गाणे झाले, आपला स्वभाव पण कोळसा सारखा आतून आणि बाहेरून एकसारखाच आहे असं रिलेट होऊ लागलं. 
जमिनीतून निघणारा कोळसा एक अनमोल खनिज आहे आणि आपण त्यावर काम करतोय हे बघून अभिमान वाटू लागला, देशाला प्रकाशमय करण्यात, प्रदूषण कमी करण्यात,  मजबूत स्टील, रस्ते, बिल्डींग बनवण्यात आपला ही वाटा आहे जे जाणून छान वाटते.

  गेल्या 2 वर्षात कामात आणखी प्रगती होऊन हातात अजून नवीन मशिन्स ची divison सांभाळायची जबाबदारी आली. FSI (field safety instruments). यात तर अजूनच जास्त अनमोल खनिजे जशी की, कोबाल्ट, समेरियम, गॅडोलियम, टर्मियम, डिस्प्रोसियम, ल्यूतेटियम, स्कडिअम, यात्रियम् अशी खूप दुर्मिळ खनिजे (rare earth element) सोबत सोने सुद्धा.   खनिजे मोजण्याची मशिन्स विकणे,  मेंटेनन्स करणे, ते वापरणारे कंपनी, माणसे, त्यांच्या  मशिन्स व्यवस्थित ठेवणे आणि वेळेत ती माझ्या सर्व्हिस टीम कडून दुरुस्त करून देणे हे माझे काम. आता अनेक ज्वेलर्स, सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्या, REE शोधणाऱ्या कंपन्या, आपले मिलिटरी, पोलिस, custom हे आमचे कस्टमर. एक राहिले, ड्रग्स शोधणारे मशिन्स सुद्धा आमचे आहे. 
 यासोबत आपल्या देश सीमेवर ट्रॅक मधून येणारा, जहाजातून येणारा माल रेडिओ अँक्टिव्हिटी साठी नाही आहे हे तपासणे याचे मशिन्स इंस्टॉल करून घेणे. या कामात तर डायरेक्ट आपले जवान, मोठे अधिकारी, विविध सरकारी संस्था यासोबत काम करून खूप शिकायला भेटले. 
आता सर्विस मधून सर्विस सेल्स मध्ये आलो आहे. नवीन आयडिया शोधायच्या, त्या कृतीत उतरायच्या, सर्विस टीमला प्रेरित करायचे, नवीन स्ट्रॅटर्जी आणायच्या, ध्येय गाठायचे आणि सर्वात महत्वाचे सर्वांना सोबत घेऊन प्रगती साधायची. असं कामात बदल स्वीकारत स्वीकारत पुढे जाण्याचा आनंद वेगळाच असतो. 
 यासोबत आपले कुटुंब, मित्रपरिवार सांभाळणे आणि सर्वात महत्वाचे आपले छंद जोपासणे, जसे लिखाण, वाचन, फिरणे, सूत्रसंचालन, कविता करणे, क्रिकेट, बुद्धिबळ खेळणे आणि ते टिकवणे त्यात प्रगती करणे त्यात नवीन काहीतरी जोडणे म्हणजेच परिपूर्ण होणे अस मला वाटते. 
धन्यवाद
जयंत जगताप 


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)