बापू

उन्हाळ्यात गावी गेलो होतो. आई वडील अगोदरच गावी जाऊन घराची साफसफाई करून ठेवली होती. आम्ही दुपारी 3 वाजता पोहचलो. 
गाडी घरापासून थोडी मागे मस्करच्या दारात लावावी लागते. पण आमच्या घरातून गाडी आलेली स्पष्ट दिसते. मी गाडीरस्त्याच्या बाजूला लावतच असतो इतक्यात बापू (वडील) येतात आणि मला येऊदे येऊदे सांगत गाडी पार्क करायला मदत करतात. खरतर मला तिथला पार्किंग जागेचा पूर्ण अंदाज आहे आणि  मागेपुढे भरपूर मोकळी जागा असते, तरीही आपले काळजी म्हणून बापू सांगत असतात आणि मी ही त्यांचं ऐकत ते म्हणतील तितकीच मागे पुढे घेतो आणि पार्क करतो. 
मग गाडीवरील बॅग्स, आणलेले काही सामान सर्व काही बापू घरात पोचवतात. 
आई तर लाड करतेच पण बापू एक विशेष प्रकारे प्रेम.दाखवतात. काळजी घेतात. 
सकाळी अगोदर उठून चूल पेटवून पाणी गरम करायला ठेवतात.  मी उठून आंघोळीची तयारी करत असतो. तोपर्यंत बापू अगोदरच 2 गरम बादल्या पाणी बाथरूम मधे आणून ठेवतात. आपण म्हटले मला एक बास आहे, तर त्यांचं उत्तर असत, घे भरपूर पाणी, अंग मोकळं कर.
 दुकानातून काही आणायचे असेल आणि आई ने मला सांगितला

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)