चीनचे हुकमी एक्के
चीनचे हुकमी एक्के : कोळसा, दुर्मिळ खनिजे(रेअर अर्थ इलेमेंट) सोन आणि इलेक्ट्रॉनिक्स.
मागील आठवड्यात असाच पेपर वाचताना एक लेख वाचला ज्यात चीन व अमेरिका संबंधावर प्रकाश टाकला होता. अमेरिकेनं 145% terrif लावले होते, ज्याला चीनने पण जशास तसे उत्तर दिले, कोणच मागे हटत नव्हते मग शेवटी अमेरिकेने 2 पावले मागे घेतली आणि टेरीफ शिथिल करून पुन्हा एकदा दोन्ही देशांचा व्यापार सुरू झाला.
यात सर्वात मोठा रोल प्ले केला तो REE (rare earth element) म्हणजेच दुर्मिळ खनिजे. ही दुर्मिळ खनिजे सर्वात जास्त म्हणजे 440M टन चीन कडे आहेत, त्याखालोखाल व्हियेतनामकडे चीनच्या अर्धे म्हणजे 220M टन आहेत, मग ऑस्ट्रेलिया, आणि इतर देश येतात. भारताकडे 69M टन आहेत.
तुम्ही म्हणाल त्याने काय होतंय. तर ही खनिजे सर्व इलेक्ट्रॉनिक्स PCB, mobile PCB, लढाऊ विमाने, पाणबुड्या, संरक्षक हत्यारे यासाठी खूप आवश्यक असतात. आणि त्याहून मोठा हुकूमचा एक्का म्हणजे ही खनिजे पृथ्वीच्या गर्भाच्या सर्वात वरच्या थरात आढळतात. तिथे खूप रेडिएशन असते, ती काढणे खूप कठीण आणि ती शुद्ध रूपात मिळवणे महाकठीण काम. आणि हे कठीण काम 90% फक्त चीनमध्ये होत. ती टेक्नॉलॉजी फक्त त्यांचेकडे आहे. यातून समजलं का चीन इलेक्ट्रॉनचे जागतिक हब आहे.
चीन कोळसा, दुर्मिळ खनिजे, सोन आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीत सध्या नंबर एक वर आहे. आणि नुसता एक नंबर नाही तर बाकीचे चार पाच मिळून जेवढे निर्मित करतात तेवढे एकटा चीन काढतोय..
म्हणून चीन दुसरी मोठी अर्थ मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जागतिक सत्ता बनायची स्वप्ने बघत आहे.
भारताला REE मध्ये प्रगती करणे आवश्यक आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि संरक्षक हत्यारे बनवण्यात मोठी झेप घेता येईल.
सध्या अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, भारत या क्षेत्रात खूप invest करत आहेत. Mining इंडस्ट्री मध्ये काम रिस्की असते पण देशासाठी खूप महत्वाचे आहे.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment