दोघेही श्रेष्ठच
दोघेही श्रेष्ठच
सर्वप्रथम हॉटेल भागश्री च्या मालकांचे खूप खूप अभिनंदन. आपल्या मेहनतीने आणि अनोख्या मार्केटिंग पद्धतीने आपण मोठा पल्ला गाठलात.
आपल शिक्षण कमी किंवा नाहीच हे माहीत पडले की अनेकांनी भुवया उंचावल्या. आपला interview बघितला आपण एकदम साधे आणि नम्र व्यक्ती आहात. आपण भले आणि आपलं काम भले..
आपल्या या यशाचा उपयोग काही न शिकलेले असा करून घेत आहेत की जणू काही शिकलेले डिग्री घेतलेले सर्व मूर्खच. अनवधानाने ते तुम्हाला शिकलेल्या लोकांच्या नजरेत विलन करत आहेत.
खरतर पैसे कमवायला शिक्षण लागत नाही. तो तुम्ही कसाही कमवू शकता..
शिक्षण लागते ते नवीन शोध लावायला, नवीन प्रगती करायला..
एक उदाहरण देतो.. शेती हजारो वर्षापासून सुरू आहे, पण त्यात नवीन शोध लागले ते शिक्षणामुळे.. शिक्षण म्हणजे फक्त बेरीज वजाबाकी नसते किंवा विविध भाषा शिकणे नसते. "एक होता कार्व्हर" अमेरिकेचा शेती शास्त्रज्ञ. त्याने खूप बिकट परिस्थिती मध्ये अभ्यास केला, शेतीवर संशोधन केले तेव्हा कुठे शेतीउत्पादन वाढले.
असेच सर्व क्षेत्रात असतें सिमेंट असो की गाड्या असो त्या विकणारा उद्योजक असला तरी त्यांचे प्रोडक्शन, त्यांची क्वालिटी, ठरवणारे डिग्री घेतलेले इंजिनियर असतात, डिग्री ची खिल्ली उडवणारे शेवटी मोठी डिग्री असलेला डॉक्टर शोधतात.. आपल्या पोरांना डिग्री घेतलेलं शिक्षक असलेली शाळा शोधतात, शेती, दूध, पशुपालन व्यवसाय यात डिग्री घेतलेले नवीन क्रांती आणतात, आणि उद्यजोक त्यातून आपला धंदा वाढवतात..
शेवटी धंदा करणारा आणि डिग्री घेणारा दोघेही श्रेष्ठच
म्हणून अशी तुलना न केलेली बरी...
धन्यवाद..
जयंत जगताप
Comments
Post a Comment