alpha
अल्फा
सध्या इंस्टाग्राम वर किंग चार्ल्स या कुत्र्याचे व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहेत. दक्षिण चीन मधील एका शेल्टर मध्ये अनेक कुत्रे पाळले आहेत त्यातील हा चार्ल्स. अंगकाठी मध्यम, सफेद रंग, केसाळ शरीर, अगदी तोंडावरही केस असलेला कुत्रा अल्फा dog म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यापेक्षा.ताकदवर, मोठे, वयस्कर कुत्रे तिथे आहेत पण याच्या साहसी, समजूतदार, इतरांची भांडणे सोडवण्याची वृत्ती, कोणी मोठा कुत्रा कमजोरवर दमदाटी.करत असेल तर हा मधे पडतो आणि कमजोरला सोडवतो. याला जो चॅलेंज करतो त्याला तो भिडतो. सहसा जास्त भुंकत नाही पण पाय रोवून उभा राहतो आणि बाजी जिंकतो. असा हा अल्फा डॉग चे व्हिडिओ पाहून मला आमच्या मावशीची म्हैस सोनी ची आठवण झाली. 1993 ते 2004 पर्यंत ती म्हैस मावशीकडे होती. घरातील गौरीचीच ती लेक. ती पण अल्फा म्हैस होती. नेहमी तिचा कळप ती लीड करायची. त्याकाळात कधी कधी म्हशी चुकायच्या किंवा हरवायच्या. एकदा डोंगरात खूप वर गेलेल्या म्हशी लवकर खाली आल्याच नाहीत. अंधार पडला माणसांनी शोधने थांबवले आणि घरी आले. आणि रात्री 9 वाजता ही सोनी सर्व म्हशींना घेऊन घरी पोहचली. त्याच्या डोक्यात सर्व नकाशा होता आणि ती इतर म्हशीपेक्षा हुशार होती म्हणून तिला अल्फा मानत. कधी कधी झुंज लागली तर ही आपल्या पेक्षा मोठी म्हैस असली तरी तिला थकवून हरवायची.
असे प्रत्येक प्राण्यांमध्ये अल्फा असतात. जे आपल्या कलागुणांनी नेतृत्व करतात.मध्ये एक ॲनिमल नावाचा सिनेमा आला होता मी काही पहिला नाही पण मित्राकडून ऐकलं त्यात देखील असच काहीतरी अल्फा मेल वैगरे कन्सेप्ट दाखवली आहे.
माणसांमध्ये देखील असेच अल्फा गुण असलेले काही माणसे असतात जी नेहमी आपल्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने नेतृत्व करत असतात.
एकतर ती नेतृत्व करतात किंवा एकटी राहतात. अशा अल्फाना साथ भेटली तर ते नक्कीच मोठ काहीतरी करतात.
पण अल्फा बनणे सोपे नसते, त्यांना अनेक चॅलेंजर चॅलेंज करतात, अनेक विरोधक तयार होतात. त्यांना नमवण्यासाठी अनेक बीटा म्हणजे अल्फापेक्षा कमी असलेले प्रयत्न करत असतात. त्यांना नेहमी.सतर्क राहावे लागते. पण ते जे करतात ते पूर्ण झोकून देऊन करतात.
किंग चार्ल्सने असे अनेक अल्फा चे गुण दाखवले आहेत आणि सध्या तो त्या शेल्टर home चा राजा बनून राहत आहे.
All the best to
charls the alpha dog.
Comments
Post a Comment