व्व्हळीच आंबे
-----*व्हळीच आंबे*-–----
काय मित्रांनो कळलं का व्हळ म्हणजे काय? अगोदर व्हळ म्हणजे काय ते सांगतो. व्हळ म्हणजे ओळ (रांग) सातारा भागात एका ओळीत किंवा रांगेत उभे राहणे किंवा काही गोष्टी तशा ठेवणे याला व्हळीत म्हणतात.
असेच आमच्या महू गावात मागच्या आळी ला अशोक बाबा च एक व्हावर आहे त्याच्या बांधावर 5 मोठी आंब्याची झाडे एका व्हळीत उभी होती. 5 ही झाडे अवाढव्य होती. आणि विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याची जात ही वेगळी होती. एक शेंदरी, दुसरा ढोल्या- गोटी, तिसरा काळा, चौथा शेंबडा आणि एक गावठी फळ.
त्यांची नावे ही अनोखी होती, पहिला जिथे उभा होता त्याच्या बाजूला कळक होती म्हणून तो कळकितला, दुसरा काळा रंगाचा म्हणून काळा, तिसऱ्या च खोड खूप मोठं आणि जाड होत म्हणून तो ढोल्या चौथा होता तो शेंद्री फळाचा म्हणून शेंदरया आणि पाचवा शेंबड्या फळाचा म्हणून शेंबड्या.
खूप जुनी झाड होती ही. लहानपणी उन्हाळ्यात या झाडाखाली दुपारची मुलांची गर्दी असायची. वेगवेगळे आंबे आणि त्यांचा पिकण्याचा काळ ही वेगळा होता म्हणून पूर्ण उन्हाळा ते आखड येई पर्यंत ही झाडे गावकऱ्यांना आंब्याची चव चाखायला द्यायचे.
अजूनही उन्हाळा आला की मुंबई ला हापूस खात असलो तरी यांची चव जिभेवर रेंगाळते. श्रीधर शिवाजी गोळे ने मागील आठवड्यात मेसेज केला की "तो आंबे खातोय आणि समोर व्हळीच आंबे आठवत आहेत." 'दादा, त्या आंब्याच्या झाडावर काहीतरी लिही."
आता गावी गेलो आणि सकाळी उठून आवर्जून ती झाडे बघायला गेलो. आता काळानुसार यांची फळे येणे बंद झाले, आंबे म्हातारे झाले. त्यात कळकीतला आंबा दिसला नाही. दिसले ते फक्त त्याचे बुंध्यात कापलेले मूळ.
त्याच्या बाजूला काळा होता पण तो वाळत चालला होता. बाकीचे अजूनही फळ नाही पण सावली आणि ऑक्सिजन देत उभे आहेत. 2 दिवसांपूर्वी महू वरून पाचवडला येताना प्रदीप किसन गोळे सोबत आलो तेव्हा गप्पा मध्ये समजले त्या रात्री बांधाला लावलेल्या आगीत काळा पण उभा जाळून खाक झाला आहे. योगायोगाने त्याअगोदर मी जाऊन त्या चौघांचा विडिओ बनवला होता.
आता 5 पैकी 3 तिघे जण उभे आहेत व्हळीच नाव अमर ठेवण्यासाठी.
ज्यांनी कोणी ये व्हळीच आंबे लावले आणि वाढवले त्यांना मानाचा मुजरा.
धन्यवाद
जयंत जगताप
7738022343
Comments
Post a Comment