बापू पोकळे

  *हार न मानणारा बापू  पोकळे*
प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते.कोणी नियोजन करून जगतो कोणी नियोजन चुकलं की निराश होतो कोणी परत लढतो आणि कोणी काहीच नियोजन न करता येणाऱ्या परिस्थितीलाच नियोजन बनवततात. 
 हातात काही असो व नसो पण बिनधास्त जगणे काय असते ते शिकवणारा असा अवलिया म्हणजे आमचा *बापू.. (दत्तात्रय) पोकळे* .
तसा जन्माने तो धनगर पण जात कधी याने अंगाला चिकटवून घेतली नाही. कराडच्या वडूज मध्ये बिरुदेव पोकळे यांच्या घरी 1977 साली याचा जन्म झाला.घरात कोणीही शिकलेले नव्हते. वडील मुंबई मध्ये माथाडी कामगार होते. यानेही गावी कसलेही टेन्शन न घेता जेमतेम शिक्षण शिक्षण घेत दहावी पूर्ण केली आणि मुंबईला येऊन काम धंदा शोधू लागला. 1996 पहिलीच नोकरी लागली ती गेम क्लब मध्ये. तेव्हा तीन पत्ती, रम्मी, लुडो यांचे अनेक क्लब मुंबई मध्ये होते. कॅश काउंटर सांभाळायचे काम होते, वरचे पैसे खूप येत असायचे पण स्वार्थाने ते कमवावे अशी कधी बापू ची भावना नाही झाली. कामापूरत घायचे आणि बाकी मिळेल ते उडवायचे असा बापू चा स्वभाव. चांगले काम चालू होते पण घरच्यांना त्या बद्दल काही माहीत नव्हतं आणि याच लग्न करायचं म्हणून कायमस्वरूपी नोकरी महत्वाची होती म्हणून बापूला ते काम सोडून वडिलांच्या जागी माथाडी मध्ये नंबर काढला. गोणी होत्या त्या लाह्या आणि करमुऱ्याच्या. जिथे दुसरे कामगार 50-60 किलोचे काम करत तिथे बापूच काम होत 25-30 किलोच्या गोणीचे. वडिलांना कोपरखैरणे मध्ये माथाडीची खोली लागली होती तिथे बापूच कुटूंब राहायला आलं. घरात हा मोठा, छोटा भाऊ आणि बहीण शिकत होते आणि हा कमी वयात घरची जबाबदारी सांभाळत होता. लवकरच घरच्यांनी याच लग्न नात्यातल्या मुलीशी लावल. बापूचा संसार फुलू लागला. एकापाठोपाठ 2 मुली झाल्या. वंशाचा दिवा वैगरे असला कसलाही विचार न करता त्याकाळात कुटुंब नियोजन करून टाकले. 
  मित्रांसाठी सदैव उपलब्ध राहणारा बापू म्हणजे लोहचुंबक आहे. सर्वांच हसत ऐकून घेणारा बापू  सर्वांना हवा असतो. पार्टी असो, मित्रांना फिरायला जायचे असो, कोणाच्या लग्नाला एकत्र जायचे असो, सर्वांना बापू सोबत हवा असतो. मंडळाचे काम अगदी लहान मुलांसारखे झटून केलं याने. नावाची, पदाची कसलंही अपेक्षा नाही. अगदी खजिनदार झाला तरी कधी एक रुपयांचा हिशोब याने केला नाही. मंदिर बांधण्यात एक मोठा आधार बनून तो सोबत राहिला. 
  गावी गेला तरी गावचे सरपंच असो बाबा माने असो वा बाकीचे मित्र. त्याना बापू सोबत हवा असतो. अगदी गावचा एकदा ट्रकवाला गावावरून आला असेल आणि हॉटेल मध्ये जेवण करून त्याला लगेच निघायचे असेल तरी तो बापूला जेवायला बोलावणार आणि बापू पण हातातले काम सोडून तिथे जाणार. बापूने काहीही कारण दिले तरी समोरचा स्वतः खर्च करणार पण बापू ला बोलावणार. मी पण मार्केटला गेलो की e9  या गाळ्यात बापूला भेटायचे आणि J32 ला सुजित ला भेटून पुढे कामाला निघायचो.  अशा बिनधास्त स्वभावामुळे बापूचे कामावर खाडे होऊ लागले आणि 2015 ला काम सोडावे लागले. पण टेन्शन घेईल तो बापू कसला. 
लगेच शिप ने रिक्षा चालवू लागला.1 वर्षात स्वतःची रिक्षा घेतली आणि मनमर्जी ने आपला धंदा करू लागला. काही दिवसात मेडिकलची लाईन टाकायचं रोजच भाडं फिक्स झालं. 2 वर्ष व्यवस्थित चालू होतं. आता मुली मोठ्या झाल्या होत्या. मोठी 12वी ला आणि छोटी 9वी ला गेली होती. सर्व सुरळीत चालू होतं आणि कोरोना आला. सर्वांसारख सगळं सोडून बापू कुटुंबासोबत कराडला गावी गेला. जायच्या अगोदर आम्ही एकमेकांची खुशाली जाणून घेत होतो. मग मी पण गावी गेलो आणि 6-7 महिने संपर्क झाला नाही. मी ऑगस्ट मध्ये मुंबईत आलो आणि बापूला फोन केला. सर्व सुरळीत चालू झालाय तू पण ये अस त्याला बोललो पण तो गाव सोडायला तयार नव्हता. शेवटी तिथेच पेट्रोल पंपावर नोकरी शोधली, मुलींना वडूजला शाळेत घातलं.  मध्ये मध्ये बाळू मामाच्या आश्रमात जाऊन मेंढपाळ झाला. मित्रांसोबत निवांत आनंदात राहू लागला. इकडे मुंबईत रिक्षा तशीच उन्हा पावसात जीर्ण होत होती. पण बापूला त्याच काही पडलं नव्हतं. जिकडे जायचं तिकडंच होऊन बिनधास्त जगायचं.आणि नशीब पण त्यालाच साथ देत याच हा सर्वोत्तम उदाहरण आहे.
गावी काम करत करत मोठ्या मुलीच 2022 साली, 12वी पूर्ण झाली की लग्न लावून दिल. तो पर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरली होती. आता बापू ला परत मुंबईचे वेध लागले होते. कोरोना मध्ये दिवस पालटले होते. कोपरखैरणे ची रूम छोट्या भावाला वाटणीत गेली होती आणि याला घणसोली ची सिम्प्लेक्स ची रूम भेटली होती. इथे ही याच नशीब फळफळल. 2 महिन्यात सिप्लेक्स टॉवर मध्ये जाणार ही बातमी आली. याला कोपरखैरणे सोडून घनसोलीत राहायचे नव्हते म्हणून कलंबोळीत बहिणीच्या घराजवळ भाड्या ने घर घेऊन राहू लागला. सगळे बोलत होते रिक्षा खूप खराब झाली आहे हिला 50 हजार तरी लागतील पण गड्याने फक्त 10 हजारात तिला टकाटक केले आणि परत धंदा चालू केला. 
परत मेडिकल ची लाईन चालू केली, काही दिवसात मेडीकल वाल्याने याचे प्रामाणिक पणा आणि साधेपण बघून लाईन न टाकता सरळ डिसट्रीबुटर चे warehouse सांभाळायचे काम दिले आणि वरून रिक्षा चालवली तर त्याचे अतिरिक्त पैसे मिळतील अस ठरवून कामावर ठेवले. 
 बापूत आणि माझ्यात 8-10  वर्षाचा वयाचा फरक पण आम्ही मनाने पक्के मित्र. एकमेकांचा स्वभाव ओळखणारे. तो बिनधास्त आणि मी धाडसी (अस त्याला वाटत) जे असेल ते तोंडावर बोलणारा आणि काय केल्याने पुढे काय होऊ शकत हे जाणणारा. बापू जातीत न अडकणारा (अगदी त्याने जात दाखल ही काढला नाही). 
सर्वांना सोबत हवा असणारा. मित्रासाठी कधीही वेळ देणारा. आणि हक्काने मदत मागणारा. जे आहे त्यात समाधानी राहणारा. शिवसाई मित्र मंडळाचा एक मुख्य खांब, यशाचा मुख्य गाभा बापू तुला सलाम.. 

तुझा मित्र
जयंत जगताप
7738022343

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)