गावच मंदिर काम
नमस्कार,
गाव म्हटलं की अनेक विचार अनेक अडचणी आणि अनेक प्रकारचे समज गैरसमज येत जात असतात. आपलं गाव ही त्याला अपवाद नाही.
सध्या गावात काळभैरवनाथ मंदिर चे जीर्णोद्धार काम चालू आहे. जरी सर्व गाव मिळून हे काम करत असले तरी सध्या दोन विचार प्रवाह तयार झालेले दिसत आहेत. मंदिर तयार करायचे हा हेतू सर्वांचा आहे परंतु काही वयक्तिक किंवा भावकीचे वाद विवाद, काही गैरसमज काहींची दुखवलेली मने यातून एक गट तयार झाला आहे. हे वरील समस्या वर ग्रामसभा लावून त्यांना शंकांचं निरासन करून हवंय.
दुसरा गट मंदिर कामात दुसरं काही विषय नको फक्त मंदिर या विषयावर बोलावे या मताचा झाला आहे अस दिसत आहे.
तटस्थ विचार केल्यास मंदिर तयार व्हावे हे सर्वांना वाटत आहे. या कामात ज्यांना जमेल त्यांनी वेळ देणे गरजेचे आहे. तासाठी स्वयं तयार व्हावे लागते. ज्यांना वेळ जमत नाही त्यांनी वर्गणी देऊन आपली जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. परंतु झालेल्या कोंडीमुळे सर्वसहभाग होत नाही आहे.
यातून मला एक मार्ग दिसत आहे, त्यासाठी दोन्ही बाजूने एक एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे. तो असा. ज्यांनी अजून काहीच वर्गणी दिली नाही त्यांनी थोडी थोडी रक्कम जमा करावी. ही रक्कम जमा झाली की ग्रामसभा लावून सर्व विषयांवर चर्चा करून शंका निरसन करू या. आणि त्या नंतर मिळून मंदिर काम वेगात आणि जोमात पुढे नेऊया.
जयंत जगताप
Comments
Post a Comment