परडा
*परडा*
विसाव्या शतकात महाराष्ट्रातील खेडी पाडी म्हटली आठवातात ती जनावरे, गुर, त्यांचा गोठा, गोठ्यात झोपायला लाकडी फळ्यांची खाट आणि त्यावर वाकळा, गंजी, लाकडाचे माच, शेनीचा माच, अंघोळीची चिप, आणि त्याखाली तयार झालेली, केळी, पपई, सीताफळ यांची बाग. अशी बाग आणि गुरेढोरे यांनी भरलेली जागा म्हणजे *परडा*. काही ठिकाणी मिरच्या शेती ही या परड्यात केली जायची. शेतकऱ्याची हक्काची, समाधानाने निवांत बसायची जागा म्हणजे परडा. आयुष्याची जमपुंजी मोजण्याची जागा म्हणजे परडा. शेतकरी घरात कमी आणि परड्यात जास्त वेळ भेटायचा. घराच वैभव त्या परड्याच्या भरभराटीवरून दिसून यायचे.
आनंद पवार याचं चिलबल या ललित कादंबरी मध्ये परडा हा धडा वाचला आणि वडिलांना ऐकवला, त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या ऐकून मन भरून आले.
गावाकडे आलो आणि एक परडा दिसला. आठवण म्हणून त्याचा व्हिडिओ बनवून इथे देत आहे. नक्की बघा आणि आनंद घ्या.
https://youtu.be/xVAcq0aQbAs
धन्यवाद
जयंत जगताप
7738022343
Comments
Post a Comment