आराध्य डायरी
आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. बदल आहे. अजून खूप प्रवास करायचा आहे.
शाळा, प्रज्ञाची ओटी थेरेपी. अवलोक ची स्पिच थेरेपी, आणी आता सोनालीची स्पिच थेरेपी अशा चार ट्रिटमेंट चालू आहेत.
2017 मध्ये खुप प्रगती झाली आहे.
आम्ही नवीन घर घेतले आहे. आरू हुशार झाला आहे.
आता 2018 मध्ये काही नवीन गोष्टी करायच्या आहेत.
दूसर्या बाळाची तयारी करायची आहे. त्याअगोदर मनीषाची तब्येत पूर्ण फिट करायची आहे. आराध्य ला नर्सरीत अॅडमीशन घ्यायचे आहे. मला माझा फिटनेस वाढवायचा आहे.
मबीऐ पूर्ण करायचे आहे. नोकरीत नवीन संधी शोधायची आहे.
सामाजीक कार्यात मंदिराच्या बाबत काम करायचे आहे.
आता विशाखापट्टणम वरून मुंबईत आलोय.
12/8/2018
काल आरूची लिना देशपांडे कडे डेव्हलपमेंट चाचणी झाली.
त्याची समज चांगली वाढली आहे. 1 वर्षाने प्रगती झाली आहे.
6/9/2018 गुरूवार
दिव्यम सेंटर मध्ये आता स्नेहल मॅडम थेरेपी घेत आहेत. 1 महीना पूर्ण झाला आहे. सेंटर प्रशस्त आहे. सर्व सुविधा युक्त बनवले आहे. पहीला व दूसर्या माळ्यावर थेरेपीसाठी विवीध रूम्स् तयार केलेले आहेत. सर्व स्टाफ खुप सहकार्य करतो व मैत्रीपूर्ण वातावरणात सेशन्स होतात. सकारात्मक विचार व लहरी येथे तयार होतात अस वाटत.
आरूचे सेशन्स दूसर्या माळ्यावर कौशल्य नावच्या थेरेपी रूम मध्ये होते. येथे सुरक्षेची खुप काळजी घेतली आहे. सध्या आम्ही कोपरखैरणे ते टिळक नगर ते दिव्यम सेंटर आणी परत घरी असा प्रवास करत आहे. पूढील महिन्यात घाटकोपर मध्ये स्थालांतरीत होणार आहे.
आरूमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. सोबत आम्हीही खुप सकारात्मक व उत्साहीत होत आहे.
सध्या योग्य दिशेने वाटचाल चालू आहे असे जाणवत आहे. लवकरच आरू बोलेल मग त्याचा आलेख उंच उंच वाढत जाईल याची खात्री होऊ लागली आहे.
13 आॅगस्ट ला आरूला आखडी आली होती 5 मिनीट तो त्या स्थितीत होता.
21/11/2018.
दिवाळी साजरी केली आता परत थेरेपी चालू झाली आहे.
समज खूप छान वाढली आहे. पण आम्ही वाट पाहत आहे ती बोलताना बघायची.
परीश्रम चालू आहेत . आता जगायची पद्धत बदलली आहे. आम्ही दोघेही जबाबदारी वाटून घेतली आहे.
१०.०४.२०२४
आराध्य साडेनऊ वर्षाचा झाला आहे. समज वाढली आहे आणि तितकाच हट्टीपणा पण.
स्वतच्या हाताने जेवतो, बोलले त्याला बऱ्यापैकी समजते. अजून शब्द बोलता येत नाहीत. व्हिज्युअल distraction खूप हवं असतं त्याला. Batmintan हलवणे, प्लास्टिक पिशव्या फडणे आणि त्यांचे तुकडे हलावने, टीव्ही वर सतत गाणी बघायला अवडणे. झोपेत दात खाणे, या सवयी सध्या चालू आहेत.
27.10.2024
आज सकाळी आरध्य ल आखडी आली. मागील आठवड्यात त्याला फ्रीझियम गोळी चालू होती.ती बंद केली कारण त्यामुळे तो खूप चिडचिड करत होता.
सध्या फक्त लेवेरा दोन वेळा प्रतेली 5ml चालू आहे.
मनिषाचे कालचे निरीक्षण असे आहे की
काल तो खूप चिडचिड करत होता, मागील अखाडी 2 महिन्यापूर्वी आमवस्ये पूर्वी 7 दिवसांनी आली होती. आजची आखडी सुद्धा तशीच आली आहे.
Comments
Post a Comment