धुरंधर Dhurandhar
#धुरंधर #Dhurandhar धुरंधर धुरंधर (Dhurandhar) म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अत्यंत निपुण, तरबेज, प्रख्यात, अग्रगण्य किंवा सर्वोच्च दर्जाचा विद्वान/व्यक्ती. हा शब्द सहसा खूप अनुभवी आणि जबाबदारी पेलू शकणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. सिनेमा पण असाच आहे. आदित्य धर ने जबरदस्त बनवला आहे. आतापर्यंत अनेकांनी धुरंधरवर इतके लेख लिहिले आहेत की आता एक पुस्तक तयार होऊ शकते. त्यात मी अजून वेगळे काय लिहिणार... मित्र आणि त्याग एक प्रसंग मला मनाला खूप भिडला तो म्हणजे जस्किरतचा लहानपणीचा मित्र आणि बहिणचा नवरा ज्याला तो बहिणीची जबाबदारी देऊन आला होता आणि पाकिस्तानात ज्याने त्याला पूर्ण सेट होण्यासाठी मदत केली तो आलम. ज्याला जस्किरत आपला आधार मानत असतो आणि एकमेव असा व्यक्ती ज्याच्याशी तो मनातलं बोलत असतो. दोघेही एकाच वेळी एकाच क्षणी मरतात.. पिंडा मरतो आणि पुढच्या सीन मधे जस्किरत बाहेर पार्टीमध्ये येऊन हताशपणे खंबा उचलून गटा गटा पित असतो, पण इकडे प्रेक्षक म्हणून आपण अस्वस्थ होत असतो, आता नक्की काय होणार. हा सापडणार की काय? आणि...