पहाटेचा प्रवास
सकाळचा प्रवास नेहमीच आल्हाददायक असतो. मनाला एक नवीन चेतना देऊन जातो. मन अगदी चहूदिशांना फिरून येते आणी एखद्या आठवणीत अगदी खोल खोल जाऊन आठवणीचा गाळ ढवळुन येते.
आजही असाच पहाटे 4:30 वागतात उठलो आणी बॅग घेऊन रेल्वे स्टेशनकडे चालत निघालो. वातावरणात शांतता कती असू शकते हे अनूभवले. किती गारवा असतो हवेत. आकाशात सोनेरी भगव्या छटा दिसत असतात आणी सफेद झालेला चंद्र आपल्या घराकडे निघालेला असतो. मी पण तेलंगाणातील मंचेरीअल गावातून आगगाडी पकडून हैदराबाद मग विमानाने मुंबईकडे माझ्या घरा कडे निघालो. रस्ता तसा फक्त 200 मिटर चालायचा होता पण हा संपूच नये असे वाटत होते. एका कोपर्यात एक चहा वाला चहा उकळवत होता. बाजूला पेपर वाला पेपर मध्ये पूरवणी लावत होता. दूर उंचावर स्टेशन दिसत होते. चहा पियायची ईच्छा मी काही टाळू शकलो नाही आणी एका कपात चहाचे घोट घेत मोबाईल वर मेसेज वाचू लागलो. विचारून वरचा "एक दिवस पाणी संपेल" हा लेख वाचला आणी मन इतीहासात गेले. आपल्याला आपल्या ठेव्याची किंमतच नाही. पाणी असो नैसर्गिक संपदा असो प्राणी असोत आपली खाद्य संस्कृती असो आयुर्वेद असो योगा असो प्राचीन ठेवा असो. आपण फक्त त्याच्या असण्याच्या स्तूतीत रमलोय, टिकवण्याच्या प्रयत्नात नाही. अगदी भाषेत पण तेच झालय संस्कृत, मराठी केवढ्या संपन्न भाषा पण आम्ही फक्त त्या किती जून्या आहेत या कौतूकात आहोत. लिहायला बोलायला आम्ही 10% पण नाही.
मग काय करायचे हे बदलायला. वर लिहलय ते नकारत्मक वाटेल पण वास्तव त्या दिशेनेच चाललंय. मग नक्की करायच काय.
मला वाटते सर्वप्रथम स्वताचा वेळ वाचवा आणी ह्या कामासाठी सक्ती ने द्या. सुरवात स्वताः करावी लागेल. आणी करा आणी केलेले अभिमानाने सांगा. म्हणजे इतर प्रेरणा घेतील. पाण्यासाठी माझ्याकडून काही घडले नाही पण स्वच्छता ठेवण्यात मी आघाडी घेतलीय. स्वताचा कचरा स्वताच्या बॅगेत ठेवायचा. जर एखादा टाकताना दिसला तर न टाकयला विनंती करायची. एकदा तर लोकल मध्ये दोन मुले भेळ खाऊन कागद टाकत होते, मि सरळ तो कागदच मागीतला आणी हातात ठेवला. अगोदर त्यानी रागात बघीतले पण मी हसून प्रतीसाद दिल्यावर वातावरण निवाळले. सोबत पत्नी होती तिनेही कशाला? असा चेहर्याच्या हावभावावरून प्रतीसाद दिलापण नंतर खूष झाली. मग तो कागद परत त्या मुलाला देऊन म्हटले "स्टेशन आले की कचरा डब्यात टाक".
असेच ज्या रिक्षात बसतो किंवा टक्सीत बसतो त्याना विनंती करतो. माझ्यासबोत असाल तोपर्यंत रस्त्यावर थूंकू नका. भले तुम्हाला जे खायचंय ते खा तो तूमचा आधीकार पण रस्ता तूमचा नाही. कधी कधी ह्याचा परीणाम त्यांच्या वेसनावर पण होतो.
असेच पाण्यासाठी करूया जमेल तिथे अडवूया. पाण्यात कचरा (घण व द्रव ) टाकणार्याला अडवूया. अमीरखान छान मोहीम राबवतोय. आपणही करूया.
निवडा एक जागा कोठेही, अख्खा महाराष्ट्र आपलाच आहे. एखादा माळरान खोदूया पाणी जीरेल. जेवढे जास्त पाणी धरणीमाता पीयेल तेवढ्ये ऊद्या आपल्याला मिळेल.
असो थांबतो आता.

Comments
Post a Comment