जून जूलै 2017

परवा रात्री म्हणजे 13जूलै 2017 ला मनीषा ला साईस्नेहदिप मध्ये अडमीट केले आहे. मी रायपूरला साईट वर आहे. तिच्या सफेद पेशी वाढलेत. बरकड्या दूखत होत्या श्वास घेताना. आता ठीक आहे पण एक्स रे मध्ये थोडे इन्फेक्शन दाखवलय. डाॅकटरांनी सिटी स्कॅन करायला सांगितले आहे. आता मी विमानात आहे. आज सिटी स्कॅन करून घेतो. रिपोर्ट तर नाॅर्मलच येतील पण मनातली शंका दूर करून घेऊया.

या अगोदर जून मध्ये घर घेतले. त्याची सर्व प्रकीया पूर्ण होत आली आहे. आता फक्त ताबा घेणे बाकी आहे.

2 जून ला माझ्या हाताचे ऑपरेशन करून हातातली प्लेट काढली.

मबीऐ च्या प्रथम वर्षाचे 2र्या सत्राची परीक्षा दिली.

आराध्य चे प्लेग्रुपमध्ये अडमीशन घेतले आहे.

आराध्य ला ताप आला होता तो बरा झाला आहे.

बापूना खूप जूलाब झाले होते त्यांची तब्येत खालावली होती, ती आता बरी आहे.
मनीषाला पण जूलाब झाले होते व अशक्त पणा आला होता आणी त्यात आता पेशी वाढलेत. ती पण लवकरच ठीक होईल यात शंका नाही.

गेले दो महीने जीवनातील खूप कायापालट करणारे ठरले आहेत.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)