My soul Mate

लग्नाला जवळ जवळ साडेचार वर्ष झालीत आमच्या पण अजून अस वाटतय सर्व नवीनच आहे. आमच एक गोंडस स्वप्न आराध्य आता 3 वर्षाचा होईल. आमचे स्वप्नातल घर आम्ही घेतलय. सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्ती आम्ही. चांगले वाईट अनूभव येतायत पण आम्ही डगमगत नाहीये. जिद्दीने लढतोय.
दोघे मिळून चाललोय.
माझी पत्नी, अर्धांगणी माझा बेटर हाफ     मनोरमा मनीषा बाळा पिल्लू , बल्लू  बायको अशी कितीतरी ऊपनावे आता तिला तयार झाली आहेत. आता ती मला समजते मि तिला समजतो. खरतर दोघेही चांगले आहोत, होतो. पण आमचे समज चूकीचे होत होते.  कधी संयमा ऐवजी विनाकारण भांडत होतो. फक्त एकमेकांच्या चूका दाखवत होतो. एकमेकांशी आदराने वागत नव्हतो.  कोणीही माघार घेत नव्हते आणी भांडण टोकाला जात होते. काश्मीर ला जाऊन आलो माथेरानच्या थंड हवेत गेलो पण आमचे डोके गरमच राहीले.  अलीबाग झाले पण समुद्र आम्हाला शांत करू शकला नाही. आमचे भवीष्य काही दिसत नव्हते. आमची नाव या जीवनात गंटागळ्या खात होती आणी दोघांचे आईवडील जमेल तेवढा आधार देत होते पण तो कमी पडत होता.  आमचे नात्यातील ओलावा संपतोय असे वाटत होते आणी देवाने आमच्यावर आनंदाचा वर्षाव केला आराध्य ला पाठवून.
खरतर त्याअगोदर  मनीषा आणी मी जबाबदारी ने वागत नव्हतो किंवा एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत नव्हतो. तीचे प्रेम दाखवण्याचा मार्ग वेगळा होता आणी माझा तिची वाट वेगळ्या मार्गावर बघत होतो. मला बदलायला वेळ हवा होता पण कोणत्या अटी लादून घेऊन नको होते आणी ती अटी लादून मला बदलवण्याचा प्रयत्न करत होती. मग आमचे क्लिप होत होते. आता ते बंद झालय. तिच्या प्रेमात मी दिवाना झालोय आणी तिच्यासाठी काहीही बदल करण्यासाठी तयार असतो.

मनीषा खूप भावनीक आहे. खूप लगेच रिऍक्ट होते. मन खूप हलकं आहे. कोणालाही झालेला त्रास तिला सहन होत नाही. ज्याप्रमाने थंड हवेची झुळूक काहीही कळायचे आत येऊन जाते तशी ती सर्वांसाठी काहीतरी करत असते पण ते जाणवत नाही. मग समोरचा तिचा गैरफायदा घेतो. ही खूप करते पण तिला दिखावेपणा करता येत नाही. तिने केलेले कधी कधी समोरच्याकडे पोहचते तर कधी पोहचूनही कळत नाही. मग होतो तो आत्मक्लेश. स्वत केलेल्या त्यागाचा स्वतालाच त्रास. तिला वरचेवर विचार मांडता येत नाहीत. कधी मांडते. कधी कधी सोडून देते. आता छान बोलते, सुरवातीला कमुनीकेशन आय काॅट्क्ट खूप कमी असायचा आमच्यात. त्यात मी बाहेर जास्त मग जास्तच गैरसमज व्हायचे. माझी आवाजाची पद्धत जास्त उद्धट वाटायची तिला. तशी होती ही पण ती जाणून बुजून नसायची. आता ती मला ओळखते. मी तिला ओळखतो.

कधी कधी तर ती मला  सूपरवूमन वाटते. कमी वयात किती प्रगती केलीय तीने तिच्या कामात. ती थोडी हळूहळू करते पण बरोबर करते.  Fine, precise, accurate ह्या शब्दांना खरी कींमत हीच्यासारख्या माणसांमुळेच मिळते.
आता तर काम करून आरूला एवढा छान तयार करत आहे. ते पाहून मन भरून येते. आई बापूंचे योगदान पण खूप जास्त आहेच पण नेतृत्व मनीषा करत आहे. मी फक्त बाराव्या खेळाडू सारखे बाहेरून पाणी पोहचवत आहे.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)