आराध्य डायरी 15/10/2017
14/10/2017
आराध्य आता 3 वर्षाचा होईल. 25/11/2014 ला जन्म झाला. अतीशय गोंडस बाळ जन्माला आल.
जन्मापासून चौथ्यादिवशी त्याला शुगर कमी झाली आणी आखडी आली. आखडीतच संसर्ग होऊन कावीळ झाली होती.
त्यामुळे मेंदू ला दुखापत झाली व त्याची बौधीक वाढ हळूहळू होऊ लागली. नंतर चार महीने थेरेपी घेऊन त्याला हातावर चालने बसने शिकला. 15 महीन्यात तो चालायला शिकला. सुरवातीला खूप पळायचा. खूप वेळा डोक्यावर पडला. स्वताला सावरत नव्हता. हळूहळू ते शिकला. आमच्या नजरेला नजर देऊन तो हसायचा नाही. आवाज दिला तर लक्ष देत नसे. सवा वर्षाचा झाला तेव्हा परत आकडी आली होती. पण त्यात काही नुकसान झाले नाही मेंदूला. पण त्या नंतर खूप चंचल झाला. खूप पळायचा हातीत काटी घेऊन हालवत फिरवायचा. आम्हाला काही समजत नव्हते.
दोन वर्षाचा झाला आणी डाॅ. शेखर पाटील कडे रूटीन चेकअप साठी घेऊन गेलो. त्यानी त्याला तपासले आणी आकुपेशनल थेरेपीची गरज असल्याचे सांगितले.
इथून पूढे आमची खरी परीक्षा चालू झाली होती. अग्नीपरीक्षा आहे की जीवन परीक्षा ते माहीत नाही पण याय आम्ही पास होणार यात शंका नाही. एका नवीन जगात आमचा प्रवेश होत होता. आमच पिल्लू आम्हाला या विश्वात रमवायच आहे. तो होता फक्त त्याच्या जगात. आता आम्ही तिथे जाणार आहे तिथून तुला परत आणायला. खूप गोष्टी बदलल्या. सर्व काही करायचे ते आराध्य ला केंदस्थानी ठेवूनच करायचे होते.
26डिसेंबर 2016 पासून लढतोय, आणी एक एक पायरी चढतोय. परस्थीती नवीन नवीन परीक्षा पेपर तयार करतोय. कधी कधी आम्ही एखादी पायरी माघार घेतोय पण थांबत नाहीये. परत वर चढतोय.
2017 मध्ये मग वेगवेगळे डाॅक्टर ना भेटलो.
ईटीसी हाॅस्पीटल मग गव्हरमेंट हाॅस्पीटल ला भेट दिली. तिथे एक IQ test केली. मग यवले मध्ये आॅकीपेशन थेरेपी चालू केली. एक महीना झाला आणी असेच एक दिवस गेंडा गार्डन मध्ये खेळताना एक बाई भेटली त्यांचे नाव सोनाली पवार. त्यांच्या मुलाला पण ओटीझम चा त्रास होता. अशीच बोलता बोलता मी आरूचे पण सांगीतले. पण त्या म्हणाल्या याला बघून वाटत नाही अस काय असेल. मग त्यानी दोन डाॅक्टर ची नावे दिलीत. डाॅ लिना देशपांडे व डाॅ. प्रज्ञा लोट्टे. इथे आमची खरी विजयी वाटचाल चालू झाली.
लवकरच दोन्ही डाॅक्टर ची अपोयंटमेंट घेतली व उपचार चालू झाले.
प्रज्ञा मडमचे थेरेपी जशी जशी पूढे जाऊ लागली. आरू मध्ये अविश्वसनीय चांगले बदल होऊ लागले.
सुरवातीलातो नजरेस नजर देत नव्हता. एका जागेवर बसत नव्हता. फक्त पळायचा. स्वतावर कंट्रोल नव्हते. चढ चढू शकत नव्हता, पायरी चढत नव्हता. स्वता जेवू शकत नव्हता. पाणी पिणे, लगवी किंवा पोट खाली करायला जायचे आहे हे सांगायला किंवा खुनवायला येत नव्हते. भुक लागली हे सांगायला येत नव्हते.
पण आज गेल्या 9 महिन्यात हे सर्व शिकला आहे.
आता खूप पुढे आलाय. नजरेस नजर अप्रतिम देतो. हट्ट करतो. चवी कळतात. जेवायचे, पाणी, सु, शी, बाहेर जायचे बिछाना टाकायचा हे सर्व कळते. गाडीवर बसतो. बसायचे म्हणून हट्ट करतो. हे सर्व खूप आनंद देऊन जाते.
पण आता नवीन आव्हान उभे राहीले आहे. आकडी येते ती थांबविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
त्यामुळे होणारे डमेज कमी करायचे आहे. आता हे आव्हान पेलतोय.
मागील महिन्यात त्याला खूप मोठी आकडी आली होती 40मीनीटे त्या स्थितीत होता. मनीषा आई आणी ताईने खूप धावपळ करून त्याला वाचवलय. मी कामानिमित्त घरापासून दूर होतो. 4 दिवस तो सनशाईन हाॅस्पीटल मध्ये होता. आता त्याला वल्परीन औषध चालू आहे. सोबत होमीयोपॅथीक गोळ्या चालू आहेत. माझा शालेयमित्र डाॅक्टर आयुर्वेदाचार्य विजय भोईर ही खूप मदत करत आहे.
पुढील आठवड्यात हिंदूजा हाॅस्पीटल मध्ये अपोयंटमेंट आहे. बघूया डाॅक्टर काय सांगतात ते.
Comments
Post a Comment