आराध्य डायरी 15/11/2017

मागील महीन्यात अजून एक डाॅक्टरांचा रेफर्नस मिळाला.
डाॅ. प्रवीन जैन. डाॅ. चीत्रा दाभोळकराचे क्लासमेट. आणी महाराष्ट्र फक्त वाजलेले बालतज्ञ आहेत ते.
आराध्य ला त्यानी पूर्ण तपासले आणी वजनवाढीसाठी, मेंदूसाठी, पचन व्यवस्थित होण्यासाठी, भूक लागण्यासाठी औषधे दिलीत. नूनूची त्वचा अजून मागे जाण्यासाठी एक क्रिम दिली आहे. आणी एक आकडी चे चालूच आहे.  गेले 25 दिवसात खुप बदल जाणवत आहे आराध्य मध्ये. वजन आणी उंची वाढली आहे. संडास व्यवस्थित करत आहे. पहाटे अगोदर रडत उठायचा ते बंद झाले आहे. ताकद वाढली आहे.  हळूहळू चांगले परीणाम जाणवत आहेत. आता काहीतरी सकारात्मक होत आहे असे जाणवत आहे.
आई, मनीषा, बापू खुप मेहनत घेत आहेत. मी कामानिमित्त बाहेर येतो पण पण त्याच्यातच गुंतलेले असते.
त्याची प्लेग्रुप ची शाळा चालू आहे पण अजून शांत बसत नाही.
अजून वेळ लागेल. संयम ठेवावा लागणार आहे.
बघूया अजून खूप मेहनत घ्यायची आहे. ती घेऊच. आराध्य चे यश  बघायचे आहे. कष्ट घ्यायला कमी पडायचे नाही.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)