चार आघाड्या

13/11/2017.
आज पुन्हा दोन महीन्यानंतर एस्सार महान मध्ये आलो.
आॅफीसच्या कामासाठी इथे आलो आहे. सिस्टम मध्ये एरर आहे. तो सुधरवण्याची जबाबदारी आहे माझ्यावर.

आराध्य ची शाळा चालू आहे त्याला बघणे व लक्ष ठेवायचे आहे, त्याची जी थेरेपी चालू आहे त्यावर बारीक लक्ष ठेवून काम करायचे आहे.   

मंदिराला नोटीस आली आहे सिडकोकडून, त्यावर काम चालू आहे. सिडकोमध्ये जावून त्यावर बाजू मांडण्यासाठी तयारी चालू आहे. मला जायला जमणार नाहीये पण सर्व तयारी करून घ्यायची आहे. सगळीकडे फोन फिरवने चालू आहे. मंदिर समिती व हिंदू जागरण समितीकडे संपर्क झाला आहे.

चौथे,  मबीऐ ची परीक्षा आहे त्याचा अभ्यास चालू आहे त्यावर पण लक्ष केंद्रित करावे लागत आहे.

अशा चार आघाड्या वर सध्या मन विभागले आहे. मि मुंबई पासून दूर एका खेड्यात आहे. शांत बसलो आहे पण मनात विचारांचे हल्लकल्लोळ चालू आहे. कशासाठी काय करायचे. कोणाला भेटायचे. सिस्टम काय बदल करू शकतो. आरूसाठी काय करावे लागेल. अभ्यास कसा करायचा आॅनलाईन पेपरसाठी कसे तारखा द्यायच्या. इथून पुढच्या साईटवर कसे जायचे. सर्व सर्व मनात फिरत आहे.

काय कसे कुठे कोण कधी का असे सर्वप्रकारचे प्रश्न उठतायत आणी मीच त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)