आवडलेले माझे विचार

1) "मन नुसते समुद्राएवढे असून  चालत नाही"
तर खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल  लाटांसारखी,  वेदना सहन करण्याची सहनशक्तीही त्यात असावी लागते.

2) चांगल्या कार्यात काही अपशकुन नसतो. जे काही असते ते आपल्या मनाची  चंचलता असते. संकटे येत राहतात. आपले काम लढत राहणे असते. योग्य वेळी यश मिळते. कधी कधी ते नियतीच्या मनात नसेल तरीही प्रयत्न केल्याचे समाधान आपल्याला लाभते.

महाराज तर निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू!  असे होते.
10/8/2018
कोपरखैरणे मध्ये  मंडळ खुप आहेत आणी जिगरबाज कार्यकर्ते सुद्धा कमी नाहीत.
पण शिवसाई एकमेव मंडळ आहे ज्याच्या कार्यकर्त्यांनी स्वताचे मंदिर उभे केले आहे. फक्त जय शिवराय बोलून शिवकार्य होत नाही. जमीनीवर काम करावे लागते. समाजासाठी काही तरी उभे करावे लागते.
आज या वरदविनायक मंदिरात विवीध क्लासेस घेतले जात आहेत. तबला, हार्मोनिअम शिकवले जाते . त्यासाठी सर्व कोपरखैरणेतून उत्साही मुले येतात.  लहान मुलांना पोलिओ लस पाजण्यासाठी  मंदिरात कम्प लावला जातो. रक्तदान शिबिर मंदिरात घेतले जाते.
विभागातील नागरिकांना सण साजरे करायला मंदिरात जागा उपलब्ध होते. घरगुती कार्यक्रम येथे पार पाडले जातात.
मागील सोमवारी ज्ञानेश्वरी पारायण सांगतेचा महाप्रसाद मंदिराच्या प्रांगणात बनवण्यात आला.
लहान मुलांना तर खेळण्यासाठी मंदिराचा परीसरच फक्त उपलब्ध आहे.
सर्व सण अगदी गुढीपाडवा, गणपती, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, गणेश जयंती ते कार्यकर्ते चे वाढदिवसाच्या साजरे करत एकोप्याचे वातावरण तयार करत एक गावचा माहोल येथे तयार केला जातोय. हे कार्य करून मंडळ खरा शिवधर्म आणी हिंदूधर्म जोपासत आहे. 
मंडळाच्या सर्व आजी-माजी तरून-वरीष्ठ जुने-नवीन  लहान-मोठ्या, स्त्री-पुरूष कार्यकर्तेचे मनापासून अभीमान वाटतो. सर्वांचे अभीनंदन आणी धन्यवाद.
----------शिवसाई मित्र मंडळ वरदविनायक मंदिर ट्रस्ट  कोपरखैरणे नवी मुंबई.----------------------

19/09/2018

संकटाच्या आणी युद्धाच्या काळात तंदुरुस्त आणी खंबीरपणे उभे राहीले की कोणतेच संकट जास्त वेळ टिकत नाही.

20/09/2018

मोठे ध्येय गाठण्यासाठी आणखी एक छोटे पाऊल उचलत आहे.
घर बदलत आहे उद्दिष्ट नाही.
लढण्याची जिद्द आणी प्रयत्नांची धार अजूनही तशीच आहे.

13/1/2019
जीवनात आनंदी रहायचे असेल तर एक तर आहे ती परिस्थिती स्वीकारा, नाहीतर परिस्थिती बदलायची खमक ठेवा.

10/06/2019
सर्वशक्तिमान असूनही बुद्धिबळातील वजीराला त्याच्या चालीची वाट बघावी लागते, तसेच तुम्ही कितीही शक्तिशाली असलात तरी हवी ती गोष्ट मिळवायला ती वेळ यावी लागते.  - जयंत जगताप

10/07/2019
पाठीमागे उभे राहून लढ लढ म्हणणाऱ्या शभरांपेक्षा, सोबत उभा राहून लढणारा एकटा जास्त शक्तिशाली असतो..
                                       जयंत जगताप

7/8/2019
तू प्रयत्न कर, लढत रहा, मी तुला हारु देणार नाही.
आम्हाला स्वतःसाठी जिंकायच नाही, आणि तुला हार ही देणार नाही.
तुला जिंकायचंय, पण पध्दत माझी असेल.  तुला लढायचे आहे जगासोबत, स्वतःसोबत आणी प्रसंगी आमच्यासोबत ही.
आम्ही तुझ्याबरोबर हरू, पण तुझ्यासाठी नेहमी जिंकत राहू.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)