Strange things of my life

1)माझे 2 मोबाईल हरवलेत दोन्ही ट्रेन मध्येच.
2) मी धावत्या ट्रेन मधून उडी मारली आहे. कल्याण स्टेशन मध्ये . लॅपटाॅप ची बॅग पाठीवर न घेता पोटावर घेतली होती, प्लॅटफॉर्म वर तोंडावर पडलो होतो पण बॅग मुळे काही लागले नव्हते.
3) लोकल मध्ये वन टू वन मारामारी केली आहे. कळवा ते मुंब्रा स्टेशन दरम्यान. मार पण खाल्ला आणी दिला पण. तिघांना नडलो आणी डेरींग मुळे वाचलो.
4) जनरल, स्लीपर 2nd A.C. 3rd A.C. 1st A.c., विमान, जहाज बस टॅक्सी, प्रायव्हेट ट्रॅव्हल सर्व प्रकारे प्रवास केला आहे.
5) कर्नाटक मध्ये वाडी नावच्या छोट्याशा स्टेशनवर बसून कडक थंडीत रात्र घालवली आहे.
6) ट्रेन मध्ये खाली पेपर टाकून झोपलो आहे.
7) पंक्चर बाईक माथेरानच्या घाटात चढवली आहे.
8) सायकल वरून 14 किमी रोज असा 1 वर्ष प्रवास केला आहे. ते पण डबल सीट.
9) लहानपणी कोणी माझी खोड काढली तर मी दगड घेऊन त्याचे डोके फोडत असे. त्यामुळे माझे नाव दगडीच्या असे पडले होते. एवढा रागीट होतो की छोटे मोठे बघत नसे.
आजही वयस्कर मानसे माझी चौकशी करतात की शांत झालो की तसाच आहे.
आत्ता कोणी लहान मुलाने मस्ती केली तर माझ्या मस्तीशी तुलना करतात. असा माझा उचांक होता अस वाटतय.
आता ते ऐकून मीच अचंबीत होतो आणी मला कस संभाळल माझ्या आईने त्याचे कौतूक वाटत. ☺ तस एखादच दिवस माझा मार न खाता गेला असेल लहानपणी. 
 
10) शाळेत पाढे पाठांतर व निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले आहेत.
11) 2 महिन्यात 3 कंपन्या बदलल्या होत्या व सोबत घराचे काम चालू होते. आणी त्यात 1 महीना आराम करत होतो.
12) इंजिनियरींग ला ड्राॅप पडला होता तेव्हा नाटके बघायची म्हणून नाट्यगृहात नोकरी केली टिकीटचेकरची आणी नाटके बघीतलीत 4 महीने.
13) मग गावी जाऊन ज्ञानेश्वरी पारायन वाचले. गावात 2 मित्र जमवले गावचे जीवन जगलो.
14) काॅलेज ला असताना स्थापन केलेल्या मंडळचा सभासद ते आज सेक्रेटरी झालो आहे.
15) गणपतीचे सुंदर भव्य मंदिर बांधण्यात छोटासा हातभार लागला आहे.
16) लहान मुलांचे विवीध स्पर्धा घेत घेत कधी माईकवर बोलू लागलो आणी एक चांगला वक्ता झालो हे कळलेच नाही.
17) 2016 ला बाईक अपघात झाला व डाव्या हाताचे मनगट मोडले होते. पण त्या परीस्थितीत स्वताले सावरले व ज्या गाडीमुळे अपघात झाला होता त्याच्याच गाडीत बसून दवखान्यात गेलो होतो.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)