खरा उडता पंजाब
खरा उडता पंजाब
वाहे गुरू जी का खालसा, वाहे गुरूजी की फत्ते.
बातम्यांमध्ये न्यूज चॅनेलवर दाखवण्यात येणारा पंजाब आणी मी पाहिलेला पंजाब मध्ये मला खुप फरक जाणवला.
गेल्या दोन वर्षांत वरचेवर 4-5 वेळा पंजाब मध्ये येणे झाले आणी एक भेट फक्त धावती झाली नाहीतर प्रतेक वेळी आठवडा काढला येथे.
दोन वेळा अमृतसर ला जाण्याचे भाग्य लाभले तर आता आहे तो भटींडा जवळ तळवंडी साबो नावाच्या, शिखांच्या पवित्र गुरुद्वारा जवळ. मी राहतोय त्या गावाचे नाव आहे मानसा.
आज दि. 14.4.2018. बैसाखी नावाचा सण आहे आणी त्यानिमीत्ताने येथे मोठी यात्रा भरली आहे. गेले दोन तीन दिवस येथे लंगर लागले आहेत. आणी फक्त लंगर लावून येणार्यानाच जेवन देय नाहीयेत तर विनंती करून आपल्याला बोलवतात. पाणी, चहा, जलजीरा, खीर, हलवा, साग, रोटी, अजून विवीध पक्वान्न वाढतात आणी येथेच्छ पाहुणचार करत आहेत.
ट्रॅक्टर ट्राॅली, ट्रक, बस भरून भरून बसच्या वर बसून आजूबाजूच्या गावातील लोक गुरुद्वारात येत आहेत. सर्वजण एकमेकांना आदराने मदत करत आहेत. पोलीस ही सहकार्य करत आहेत. जागोजागी पाणीवाटप, सरबत वाटप चालू आहे.
लंगर वर चर खोदून त्यावर जेवन बनवून वाढले जात आहे.
रोटी पण तशीच चरावर मोठा तवा ठेवून बनवली जात आहे.
जेवनाची चव खुप छान लागत आहे.
वाहेगुरूंचे दर्शन ला गर्दी आहे पण सर्वजण शिस्त पाळत आहेत. एक आनंदी वातावरण अनुभवायला मिळाले.
खरच ऐकी काय असते हे सरदारजींकडून शिकण्याची गरज आहे. उगच नाही एवढ्या मोठ्या आक्रमणात पण अजूनही देशाच्या मान ताठ ठेवलीय त्यानी. मान म्हणजे भारतमातेच्या नकाशावर ते त्या ठीकाणी येतात.
पून्हा एकदा वाहे गुरूजी के फत्ते, वाहे गुरूजी का खालसा.
जय शिवराय 🙏
जयंत पांडूरंग जगताप
Comments
Post a Comment