हो मी चालनार आहे

       ---  *मला चालायचय, मला जिंकायचंय*-----/////-----
हो मी आहे हळू कळतय मला कमी पण मला चालायचय
         तूमचे शब्द नाही कळत मला,
म्हणून मला कळतच नाही अस नका समजू
माझ जग आहे वेगळ, जे मला दिसत ते तूम्हाला नाही समजणार.
असतो मी जिथे तिथे तूम्ही नाही येऊ शकणार.
बोलतो मी  हवेशी, उडतो मी आकाशी
क्षणात इथे क्षणात तिथे असतो मी फिरत
का जखडू मी स्वताला तूमच्या बंधनात
पण मी करतोय प्रयत्न येण्याचा तूमच्या जगात.
मला चालायचय. मी चालतोय. मी विचार करतोय.
आई किती करतेस तू माझी काळजी
मी उंच उंच चढत असतो, तूझा जीव धाकधूक होत असतो
तू रागावलीस की मी हसून तूझी जीरवत असतो.

बाबा माझा हीरो आहे, मला हव ते पुरवत असतो
त्याच्याबरोबर सर्व जग फिरत असतो..
पण संध्याकाळी तूझ्याच कुशीत विसावा घ्यायचा असतो..

तूम्ही असताना माझे हात पाय, मला काय काय कमी आहे.
पण मला चालायच आहे तूमच्यासोबत धावयच आहे.

हो मी आहे स्मार्ट, आई तूझ्या मुळेच आहे मी निवांत.आई मी चालनार आता, तूझ्या सोबत धावणार आता.

                                तुमचाच आरू
                   शब्दांकन- आरूचे बाबा
                   समर्पित- आरूची आई 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)