कोपरखैरणे ला निरोप
नमस्कार मित्रांनो,
आज गणेश चतूर्थी.... गणपती बाप्पा आज आपला निरोप घेणार पण ते सदैव आपल्या हृदयात राहतात. ते जातात ते परत येणार हे सांगुनच जातात.
आज मी ही कोपरखैरणेतून बाहेर पडत आहे पण आपल्या सर्वांच्या हृदयात जी थोडी जागा बनवली आहे ती तशीच टिकवून ठेवेन या विश्वासावर.
माझ्या मुलाच्या उपचारासाठी मी माझे घर बदलत आहे. पण माझे मन, माझे सामाजीक योगदान देण्याची जागा इथेच राहील.
मंदिर आता आपण स्वयंपूर्ण बनवत आहे.
पेपरवर्क माझ्याकडे आहे. त्याचा फाॅलोअप मी करतच राहीन. काहीही मदत लागल्यास निसंकोच काॅल करा. शक्य तितक्या कमी वेळात हजर राहीन.
आपल्या सर्वांचे प्रेम, आपण साजरे कलेले क्षण आजही तसेच आठवतात व अजूनही पुढे असेच साजरे करत राहूया.
गेल्या 25 वर्षात जे काही केले ते आपल्या सहकार्यानेच. या काळात काही चूकले असेल तर मोठ्या मनाने आपण सर्व माफ कराल यात शंका नाही.
आपल्या आठवणी आणी मैत्री हीच माझी संपत्ती आहे.
शेवटी हेच सांगेन मी एक योद्धा आहे. रणांगण बदलत आहे लढण्याची जिद्द तिच असेल.
असेच प्रेम राहूद्यात
आपलाच जय जगताप
Comments
Post a Comment