ये रे फणसाखाली
ये रे फणसाखाली
काही गोष्टी, वस्तू, नावे अशी काही प्रसिद्ध होतात की एक ऐतिहासिक नाव होतात व प्रत्येकाला माहीत असतात.
असेच एक जागेचे नाव म्हणजे फणसाखाली.
महू गावातील प्रत्येक थोरा म्होठ्याच्या व तरुण मुलाच्या माहितीतील हे नाव.
या फणसाखाली जवळपास 4 ते 5 पिढ्या खेळ खेळल्या आहेत, पत्त्यांचे डाव येथे रंगायचे, गप्पांचे फड येथे सजायचे, रात्रीच्या वेळी पार्टी करायला जवळची रानातील जागा म्हणजे फणसाखाली.
लगोरी, क्रिकेट, अबदाबी, पकडापकडी, रात्री सुरपाट्या लपाछपी असे खेळ खेळायची जागा म्हणजे फणस.
गप्पा चे फड रात्री चुलीवरच्या जेवण बनवून पार्टी करायची जागा. विशेष म्हणजे या फणसाचे फणस कोणी खललेले आठवत नाही किंवा कधी कुणी या झाडाला तोडले पण नाही.
झाड किती जुने आहे हे माहीत नाही पण आता ते म्हातारे झाले आहे असे वाटते.
वर्ष 1995 ते 2010 पर्यंत गावात पत्त्यांचे डाव खूप रंगायचे. दिवसभर गावातली तरुण व म्हातारी माणसे झाडखाली रंमीचे डाव दिवसभर रंगवायचे आणि रात्री दारू करून पार्टी करायचे. हे सर्व या फणसाच्या झाडाने बघितले आहे.
आता मोबाइल युगात फणसाखली वर्दळ कमी झाली आहे.
पत्त्यांचे डाव बसत नाहीत. लगोरी अबदाबी हे खेळ कमी खेळले जातात. क्रिकेट साठी नवीन जागा तयार झाल्या आहेत.
तरीही या फणसाची आठवण येत राहील।आपल्या लहानपणच्या आठवणींची साक्ष घेऊन हे झाड उभे आहे.
जयंत जगताप
Comments
Post a Comment