आभार स्वयंसेवेकांचे

आभार स्वयंसेवेकांचे 

फेब्रुवरी च्या सुरवातीला आपल्या भारत देशात बाहेरून  एक कोरोना नावाचा विषाणू आला आणि तो हा हा म्हणत पूर्ण देशात पसरत चाललं आहे. 
जागतिक स्तरावर तर या आजाराने हाहाकार माजवला आहे. पण आपल्या देशात आपल्या सर्व सरकारनी मग ते केंद्र सरकार असो नाहीतर राज्यसरकार सर्वांनी वेळेत योग्य ती पाऊले उचलून या विषाणूचा प्रसार जास्त होणार नाही यासाठी काळजी घेतली आहे. 
यासाठीच गेल्या 18 मार्च पासून राज्यात आणि 24 मार्च पासून देशात लोक डाऊन चालू झाले आहे. 
शहरात पोलीस, डॉक्टर आणि प्रशासन सर्व ते प्रयत्न करत आहेत आणि सामान्य जनतेला या अवघड काळात मदत करत आहेत. 
असेच काम गावागावात समाजसेवक करत आहेत. 
आपल्या गावात हे काम अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन बद्ध पार पाडत आहे. गावातील सामाजिक कार्यकते आणि स्वयंसेवेकांनी एकत्र येऊन कमिटी स्थापन केली आणि खूप जबरदस्त असे नियोजन केले आहे.
खरतर जर ही कमिटी नसती तर कदाचित गावात पोलीसना फेरफटका मारवा लागला असता आणि मग कायद्यनुसार सर्वाना खूप त्रास झाला असता, पण या कमिटी ने ती जबाबदारी घेतली आणि आपले गावचे संरक्षण कसे होईल याचे छान नियोजन केले आहे. कमिटी खरच खूप मेहनत घेत आहे, यात कोणाचाही वयक्तिक फायदा नसून फक्त आणि फक्त गावचे भले आणि संरक्षण कसे होईल यासाठीच ही मंडळी झटत आहेत. 
ज्या प्रकारे महाराज्यांच्या काळात किल्याची जबाबदारी किल्लेदारांवर असायची तशीच आज शत्रूला आत न येऊ देण्यासाठी ही कमिटी किल्लेदारची भूमिका पार पाडत आहे. 
आता आपली जबाबदारी आहे ती या कमिटी रुपी किल्लेदारचे ऐकाचे. 
जर आपण या महू किल्यात अजून पुढचे 10 दिवस असेच नेटाने लढत राहिलो तर नक्कीच शत्रू आपोआप हरला जाईल. हाच आपला गनिमी कावा आहे, हीच वेळ आहे आपल्याला आपल्या महाराजांचा एक  तरी आदर्श जिवनात अनुभवाचा. 
जसे महाराज म्हणायचे फक्त लढाई जिंकणे महत्वाचे नाही तर आपली माणसे ही जपणे महत्वाचे आहे. आज आपल्याला स्वतःला आणि आपल्या माणसांना जपायचे आहे. 
अजून एक उदाहरण देतो जे माझ्या पहिल्या लेखात दिले होते, जेव्हा स्वराज्यवर संकट आले होते तेव्हा, नासिक जवळ रामसेज नावाचा किल्ला आहे. या किल्ल्यावर फक्त हजार बाराशे मावळे होते, आणि किल्याला वेढा पडला होता तो 10000 शत्रू सैनिकांचा. तरीही कोणीही डगमगले नाही, 2 ते 3 वर्ष वेढा होता, किल्ल्यात खायची पंचाईत  होती, पण कोणी फुटले नाही, करण एक फुटला तर पूर्ण किल्ला पडणार हे त्यांना माहीत होते, तसेच आज आपल्याला अजून फक्त 15 दिवस एक राहायचे आहे आणि लढायचे आहे, एक फुटला की शत्रू गावात घुसेल. असो आपण समजदार आहेत. 
आज 5 एप्रिल आपण जो दिवा पेटवणार आहे तो देशातील डॉक्टर, पोलीस, प्रशासन यांसाठी तर आहेच पण सोबत आपल्या गावातील या आपल्या संरक्षण ची जबाबदारी पेलणाऱ्या या सर्व कमिटी मेंबर साठी पण आहे हे लक्षात असुद्या. 
असेच अजून 10 ते 15 दिवस साथ द्या 
जय हिंद जय महाराष्ट्र

आपलाच 
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)