एक घास चिऊचा
एकविसाव्या शतकात मोबाइल चा उदय झाला आणि त्यासोबत चिमन्यांचं अस्त सुरू झाला, गावाकडे घराघरात फोटोमागे गवत जमा करून किलबिलाट करणाऱ्या चिमण्या नाहीश्या होऊ लागल्या. जुनी कौलारू घरे पाडून सिमेंट ची घरे आलीत, त्यामुळे घरातील मोठे फोटो, भिंतीवरील आरसे नाहीसे होऊ लागले आणि चिमन्याचे आवास संपू लागले. कोणाला याचे कारण लवकर समजले नाही, पण ज्या चिमण्यामुळे माणसे सकाळी लवकर उठायची ती आता मोबाईलचा गजर लावू लागलीत. त्या कर्णकर्कश गजर चा आवाज ला वैतागून त्यात पण कृत्रिम पक्ष्यांचे आवाज घालून गजर वाजवू लागले.
चिमण्या कमी झाल्या आणि छोटे कीडे, गोमी, जंत आळ्या वाढू लागले ज्यांना चिंमन्या खात असत.
आज 2020 वर्षात पूर्ण जगात निसर्ग ना प्रकोप धाकवला आणि कोरोना ना ने सर्वाना घरात बंदिस्त करून टाकले, फक्त पक्षी आणि प्राणी मोकळे फिरत आहेत. या कमी होणाऱ्या चिमन्यांसाठी काहीतरी घरटे असल्याशिवाय यांची संख्या वाढणार नाही, हे सर्वांना जाणवत होते पण कार्य कधी करायचे यासाठी वेळ मिळत नव्हता. तो वेळ या कोरोना ने दिला आणि महू गावात या चिमण्यांची घरटी बनवायची ही संकल्पना श्री.अविनाश रघुनाथ गोळे यांनी मांडली, त्याला साथ दिली ती श्री अमोल सर्जेराव गोळे, राजेंद्र संपत गोळे , सुजित मानसिंग गोळे , गणेश आनंदराव गोळे आणि जयंत पांडुरंग जगताप यांनी.
अविनाश यांनी त्यांच्याकडे असलेलं स्लब चे प्लायवूड उपलब्द करून दिले, सर्वाना विनंती करून त्यांच्या घराच्या मागील मोकळ्या जागेत सर्वांनी मिळून ही लाकडी घरटी बनवली, यात मोलाचे कार्य केले ते अमोल उर्फ पिंट्या आणि राजू यांनी.
हळू हळू ही घरटी तयार झालीत मग यासाठी लागणारे खिळे तार यासाठी प्रशांत आणि प्रवीण दिलीप गोळे यांनी सहकार्य केले. गणेश लक्समण गोळे यांनी रंग देऊन, हे रंग उपलब्द केले ते श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष भरत श्रीपती गोळे यांनी, तसेच शिवाजी अशोक गोळे यांनी घरटी लावण्यात सहकार्य केले.
ही घरटी तयार झालीत त्यासोबत त्यांना दाणे व पाणी यांची व्यवस्था ही करण्यात आली, त्यासाठी तेलाचे मोकळे डब्बे उपलब्ध झाले, अजून तेलाचे डब्बे शरद गोळे (टेलर) यांनी उपलब्द केले. अशाप्रकारे 15 लाकडी घरटी व 5 पत्र्याचे घर तयार करून गावातील मंदिरात लावण्यासाठी यश आले.
आता ही सुरवात बघून तरुण मुले अतिशय उत्साहित होऊन आणखी घरटी बनवत आहेत. श्रीधर गोळे यासारखे तरुण पुढे येऊन अजून घरटी तयार करण्यास सहकार्य करत आहेत.
Comments
Post a Comment