Think from 30 thousand feet hight
*Think from 30 Thousands feet Height*
भाजप ने 2019 ला महाराष्ट्रात नमते न घेता सत्ता वर पाणी फेरल तेव्हा त्यांची खूप चेष्टा झाली, खिल्ली उडवली गेली, महाराष्ट्र भाजप याची उत्तर देत राहील पण राष्ट्रीय स्तरावर याचा एवढा परिणाम जाणवला नाही. सेना NDA मधून बाहेर पडली, काँग्रेस ची बाजू घेऊन लढू लागली, काँग्रेस पण खूष होत राहिली, त्यांना असे भासू लागले की आता आपण पुन्हा सशक्त होणार आहोत. आणि गाफील पण अजून वाढत गेले। नेमकं हेच भाजप ला हवे होते असे आत्ताचे देशातील निकाल पाहून वाटत आहे. शिवसेना नेहमी बिहारी आणि भय्ये यांचा विरोध करत आली आहे, यात त्यांनी काँग्रेस ला सोबत घेतले ते नेमकं UP आणि बिहार मध्ये लोकांनी हेरलं आणि अगोदरच हिंदू विरोधी असलेल्या काँग्रेस ला द्वेष आणखी वाढू लागला. याचा फायदा भाजप ला झाला, बिहार ची निवडणूक ही उत्तर प्रदेश आणि बंगाल च्या अगोदर चा ओपनिंग स्पेल असतो, तिथे धावा झाल्या की या मोठा स्पेल आरामात खेळता येतो आणि मोठी धावसंख्या उभी राहते. हे हेरून भाजप थिंक टॅंक ने महाराष्ट्रात पहिली इंनिंग सोडून दिली आहे पण 2nd इंनिंग साठी जोरदार तयारी करत आहेत आणि इथे फडणवीस, गडकरी, मुंडे, पाटील, यांसारखे खांदे फलंदाज लढत आहेत. आता बंगाल आणि UP मध्ये जर काँग्रेस ला लढायचे असेल तर महाराष्ट्रत त्यांना अवघड निर्णय घ्यावा लागणार आहे कारण मुंबई महापालिका निवडणूक पूर्ण देशात गाजते याचे परिणाम देशात जाणवतात.
भाजप चे ध्येय एक राज्य नाही फक्त, देश पुढे घेऊन जात, हिंदुत्व जिथे कमजोर आहे तिथे ते मजबूत करायचे आहे. याचे उत्तम उदाहरण काश्मीर आहे, अगोदर तेथील फुटरवादी नेत्यांच्या गोटात घुसून त्यांना कमजोर केले, विचार पूर्वक सत्ता स्थापन करून सर्व गोपनीय माहिती गोळा करून मग सरकार पाडले, पूर्ण प्लॅन करून केंद्रशासित केल, लदाख ची फरफड होत होती ती थांबवण्यास त्यांना वेगळा केंद्रशासित दर्जा दिला, 370, 35A काढून, तेथील फुटरवादी बॅक फूट वर नेले, आज ते एकत्र येऊन आता स्वतःच्या अस्तित्व साठी लढत आहेत, (*महाराजांचा गनिमी कावा या काळात पण कसा वापरावा याचा ज उत्तम नमुना आहे*). आज अजूनही काही बिनडोक महबूब बरोबर सत्ता स्थापन केली एवढच वेढ्यासारखं बडबडत असतात, त्यापुढे ते आंधळे होतात नाहीतर नाहीतर गुलामी मूळे डोळे बंद करून घेतात, भूतकाळात केलेल्या काही हिंदुत्व कार्यामुळे (तेही आपल्या वाडवडील यांनी) आपण त्यावर जीवनभर श्रेय घेत राहायचं याला हिंदुत्व नक्कीच म्हणू शकत नाही.
या सरकारने सैन्यला फ्री हँड दिले, आज काश्मिरी पंडित परत तिथे स्थायिक होत आहेत, देशाचा जो पैसे आडमार्गाने दशतवादला जात होता तो बंद झाला, नोटबंदी मुळे काळा पैसा कमी होऊन देशविरोधी कारवाई कमी झाल्या, ऑनलाइन मुळे अनेक बोगस आणि फेक संस्था मोडीत काढल्या.
अशा या 30 हजार फीट उंचीवरील विचारांमुळे नक्कीच हा देश प्रगती करत आहे हे नक्की.
जय हिंद.
साभार जयंत जगताप
Comments
Post a Comment