वाघांचे राज्य
*वाघांचे राज्य *
एक खूप जुने जंगल होते, जंगलात वाघांचे राज्य होते, त्यात पण काही चांगले वाघ आणि काही वाईट वाघ होते, जसे सिम्बा सिनेमात असतात तसेच. काही वर्षे त्या जंगलावर वाईट वाघांचे राज्य होते त्यांनी बाहेरील आलेली तरस(hyana) सोबत घेऊन चांगल्या वाघांना कधीच नीट जागून देत नव्हते, खर तर त्या तरसंचा प्लॅन होता तो जंगल बळकवायचे आणि वाघांवर राज्य करायचे. हे चांगले वाघांना समजत होते पण वाईट वाघ काही आळशी वाघांना बसून खायला देत होते आणि त्यांना सोबत घेऊन चांगल्या वाघांचे काही चालू देत नव्हते,त्यामुळे चांगले वाघ काही करू शकत नव्हते.
पण या संधीचा फायदा घेऊन तरसांची एक टोळी लपून छपून आळशी वाघांना जे बसून बसून कमजोर झाले होते त्यांना त्रास देत होते आणि त्यांचे लचके तोडत होते. हळू हळू हा त्रास वाढत होता, वाईट वाघ सत्ता टिकवण्यासाठी याकडे दुर्लक्ष करत होते. चांगल्या वाघांनी मग या आळशी वाघांना समाजवलाय सुरवात केली आणि हळू हळू तुमचे कसे हाल होतील ते समजावले. काही आळशी वाघाना हे पटू लागले आणि ते बसून खायचे सोडून हे जंगल टिकवण्यासाठी मेहनत करू लागले.
हळू हळू आता चांगले वाघांची संख्या वाढत गेली आणि वाईट वाघ आणि तरस एकत्र होते तरीही त्यांनी जंगलात परत त्यांचे राज्य आणले. या एवढया काळात तरसानी जंगलातील बाहेरचा भाग बळकावला होता आणि तिथे वाईट वाघांना पण काही किंमत देत नव्हते, पण तिथे राहणारे चांगले वाघ मात्र तरसंचा छळ सोसत होते. त्या वाघांनी केलेली शिकार हे तरस खाऊन टाकत असत.
काही करून त्या चांगल्या वाघांना वाचवायचे होते आणि त्यांचे जंगल परत त्यांना देने गरजेचे होते. मग चांगल्या वाघांनी युक्ती करून एका तरसाची मैत्री केली, आणि त्या तरसाची टोळी फोडली, हळू हळू त्या भागात पाय जमवले आणि मग अचानक त्या भागात त्याचे राज्य परत घोषित केले, तरसांना मिळणारी शिकार बंद केली, आता जो मेहनत करेल तोच खाईल हे जाहीर केले आणि तरसाना प्रामाणिक वागायला सांगितले, आता तरस एकत्र येऊन ओरडू लागले होते पण चांगले वाघ त्या भागात मजबूत होत होते.
वाईट वाघांच्या काळात काही ताकदवर वाघ चांगल्या वाघांकडे होते पण त्यांना जंगलातील काही भाग त्यांच्याकडेच हवा होता, त्यातून त्यानी चांगले वाघ सोडून वाईट वाघ सोबत घेतले, चांगल्या वाघांनी खूप समजावले पण ते ताकदवर वाघ डोक ना लावता तुम्ही तरसांशी मैत्री केली मग आम्ही वाईट वाघ सोबत घेऊन आम्हाला पाहिजे तो भाग बळकावनर असे म्हणून त्याना सोबत घेतले.
आता चांगले वाघ अजूनही काही वाईट वाघ आणि तरसांशी लढत आहेत.
टीप: याचा काहीही राजकीय अर्थ लावू नये, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे
🙏 जयंत जगताप. 🙏
Comments
Post a Comment