विनम्र अभिवादन कै. लक्ष्मण सर्जेराव गोळे
*विनम्र अभिवादन*
गावची वाटचाल ही अनेक अशा कार्यकर्ते मुळे होत असते जे त्या त्या वेळेस गावच्या हितासाठी न डगमगता मेहनत करत असतात. ही माणसं कोणताही बडेजाव न करता आपले काम करत असतात.
गेल्यावर्षी लोकडोवन मध्ये जेष्ठ लोकांकडून अनेक जुन्या गोष्टी ऐकला भेटल्या जसे आज जे गावाला नैसर्गिक पाणी भेटले आहे, त्या साठी आपल्या पूर्वजांनी आजूबाजूच्या गावनबरोबर लढा दिला होता, एक रात्रीत डोंगरात जाऊन त्या झरयवर कब्जा केला होता व पाईपलाईन टाकून गावात पाणी आणले होते. असे अनेक कार्यकर्ते गावात कार्यरत असतात. काळाच्या ओघात ते अपल्यातून निघून जातात आणि आपण जपतो त्या त्यांच्या आठवणी. काही वर्षांनी ह्या आठवणी धूसर होतात आणि नवीन पिढ्याना त्यांचे कर्तृत्व लक्षात राहत नाही.
असेच एक कर्तृत्ववान व्यक्ती आपल्यात होऊन गेले ते म्हणजे कै. लक्ष्मण सर्जेराव गोळे. समाजसेवा, समंजसपणा आणि सर्वाना सोबत घेऊन चालणारे असे हे महान व्यक्ती आपल्या सर्वांसमोर एक आदर्श ठेऊन गेले आहेत. निस्वार्थ मेहनत करून गावाचा विकासासाठी झटणारे सर्वांचे लखन भाऊ आता एक दंतकथा बनून राहिले आहेत.
आजही सर्वाना असे वाटते कि ते असते तर महू गाव एक वेगळ्याच प्रगतीच्या वाटेवर चालले असते.
त्यांना जाऊन आता 4 वर्ष झालीत पण असे वाटते ते अजूनही कोठेतरी आहेत आणि गावाला बघत आहेत.
असे आदर्श व्यक्तिमत्व पुढील पिढया ना ही समजले पाहिजे. त्यांचे कार्य संक्षिप्त रुपात आणि त्यांचे फोटोफ्रेम आपल्या कार्यलयात लावली तर हे नक्कीच सर्वाना प्रेरणा देणारे ठरेल असे मला वाटते. आपले आदर्श आपण असे जपले पाहिजेत.
*कै. लक्ष्मण सर्जेराव गोळे याना विनम्र अभिवादन*
Comments
Post a Comment